नवाब मालिकांविरोधात फौजदारी गुन्हा?

नवाब मालिकांविरोधात फौजदारी गुन्हा?

बिनबुडाचे आरोप करणारे महाराष्ट्राचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यासाठी भाजपा नेते मोहित कंबोज यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. कंबोज म्हणाले की, नवाब मलिक हे मला आणि माझ्या कुटुंबाला वारंवार टार्गेट करत आहेत. कोणताही पुरावा किंवा आधार नसताना ते जाहीरपणे हवेत आरोप करत आहेत. मी त्यांना यापूर्वीही मानहानीची नोटीस पाठवली होती.

पुरावे द्या नाहीतर माझी आणि माझ्या कुटुंबाची जाहीर माफी मागा असे मी त्यांना सांगितले आहे. मलिक यांनी याबाबतचा कोणताही पुरावा सादर केलेला नाही. विद्यमान मंत्री म्हणून त्यांनी आपल्या अधिकाराचा आणि पदाचा दुरुपयोग केला आहे. आता मी महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्यावर माझी बदनामी केल्याबद्दल आणि माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर आयपीसी कलम ४९९ आणि ५०० ​​नुसार बिनबुडाचे आरोप केल्याबद्दल फौजदारी खटला नोंदवण्यासाठी माझगाव न्यायालयात अर्ज केला आहे. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. सत्य बाहेर येईल, सत्याचा विजय होईल. असेही मोगीत कंबोज यांनी सांगितले.

हे ही वाचा:

अमरिंदर सिंग उद्या नवीन पक्षाची घोषणा करणार?

कोवॅक्सिनला २४ तासात मिळणार डब्ल्यूएचओची मान्यता

भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा

समीर वानखेडे बाजूला झाले तर फायदा कोणाचा?

ड्रग्ज प्रकरणात आपल्या जावयाला अटक झाल्याने नाराज झालेले मंत्री नवाब मलिक एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. मंगळवारी त्यांनी एनसीबीच्या अज्ञात कर्मचाऱ्याच्या नावे पत्र जारी करून वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यावर मोहित कंबोज यांनी ट्विट केले आहे की, हे बनावट पत्र नवाब मलिक यांनीच तयार केले आहे. त्यांनी स्वतःला लिहिलेले हे पत्र आहे.

Exit mobile version