परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोलीतील दोन रिसॉर्ट अनिधिकृत आहेत. त्यापैकी एकावर कारवाई करण्याचे आणि परब यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, परब मंत्री असल्याने त्यावर कारवाई होत नाही, असा आरोप करतानाच परब यांची आज ना उद्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी तर होणारच आहे. पण त्यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी गुन्हेही दाखल होणार आहेत. त्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिला.
संचयनी ग्रुपकडून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध घोटाळ्यांवर भाष्य केलं. याच पत्रकार परिषदेत त्यांनी अनिल परब यांच्या दोन रिसॉर्टवरूनही ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
अनिल परब यांचे दापोली मुरुड समुद्र किनारी 2 बेकायदेशीर रिसॉर्ट आहेत.
1. साई रिसॉर्ट NX
2 सी कोंच रिसॉर्ट.
दोन्ही रिसॉर्ट, सीआरझेड 3 मध्ये नो डेव्हलपमेंट झोन मध्ये आहेत pic.twitter.com/hMFu6rdeqh
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 3, 2021
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिंडळातील मंत्री अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत. त्याची चौकशी झाली आहे. त्यावर कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. त्यातील एका रिसोर्टचं नाव साई रिसोर्ट ऍनेक्स असं आहे. तर दुसऱ्याचं नाव सी-कॉन्च रिसोर्ट असं असून हा रिसॉर्ट आपल्या मालकीचा असल्याचं लपवण्याचा परब यांचा प्रयत्न आहे. हे दोन्ही रिसोर्ट अनधिकृत असल्याचं केंद्राच्या टीमने राज्य सरकारने सांगितलं होतं. दोन्ही रिसोर्टमध्ये सीआरझेडचा भंग झाला आहे. पण सरकारने केवळ साई रिसोर्ट तोडण्याचा आदेश दिला आहे. दुसरा रिसोर्ट वाचवण्याचं पाप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलं आहे. पण आम्ही या रिसोर्टवर कारवाई करायला लावूच, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.
हे ही वाचा:
वसूलीखोर ठाकरे सरकार उद्योग विरोधी
पॅरालिम्पिक २०२०: प्रवीण कुमारने विक्रमी कामगिरी करत पटकावले रौप्य पदक
महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऍथॉरिटीचं परिपत्रक माझ्याकडे आहे. पर्यावरण मंत्रालयाने हा साई रिसोर्ट अनधिकृत असल्याचं घोषित केलं आहे. त्यावर कायदेशीर कारवाई करा, असा निर्णयही झाला आहे. तसं मिनिटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनाही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. मालकावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण मालक अनिल परब अजून मंत्री आहेत. मंत्रिमंडळातील मंत्रीच अनधिकृत बांधकाम करत आहे. सचिव रिसॉर्ट अनधिकृत घोषित करतात. तरीही उद्धव ठाकरे परब यांना मंत्री म्हणून कायम ठेवतात. परब यांची हकालपट्टी तर होणारच. पण त्यांच्याविरोधात फौजदारी आणि सिव्हील कारवाई करावी लागणार. हे काम भाजप करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.