आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा

आव्हाड यांच्याविरोधात आठवडाभरामध्ये दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा

हर हर महादेव चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप करत आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवार, १३ नोव्हेंबर रोजी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान भाजपा महिला पदाधिकाऱ्याने आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला आहे. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आव्हाड यांच्याविरोधात आठवडाभरामध्ये दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणानंतर आव्हाड यांनी ट्विट करत मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असं म्हटलं आहे. पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात दोन खोटे गुन्हे दाखल केले आणि तोही ३५४. मी ह्या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे, अशा प्रकारचं आव्हाडांनी ट्विट केलं आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे ‘अशुद्ध’ ट्विट व्हायरल

टिपू सुलतानाचा पुतळा बसवला तर बाबरी ढाचा सारखी अवस्था करू

दोन विमाने हवेतच एकमेकांवर आदळली आणि उसळला आगीचा डोंब

तेलंगणात सर्वत्र कमळ फुलणार

दरम्यान, याआधी विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर काढत मारहाण केल्याप्रकरणी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्याविरोधात ठाणे वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर्तकनगर पोलिसांनी याप्रकरणी त्यांना अटकही केली होती. अटकेनंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयाने आव्हाड यांना १५ हजार जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.

Exit mobile version