माकप नेते सीताराम येचुरी यांना पुत्रशोक झाला. आशिष येचुरी यांचे कोरोनावरील उपचारांदरम्यान गुरुवारी सकाळी निधन झाले. आशिष यांच्यावर गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सीताराम येचुरी यांनी ट्विटरवरुन पुत्रनिधनाची दुःखद बातमी दिली.
It is with great sadness that I have to inform that I lost my elder son, Ashish Yechury to COVID-19 this morning. I want to thank all those who gave us hope and who treated him – doctors, nurses, frontline health workers, sanitation workers and innumerable others who stood by us.
— Sitaram Yechury (@SitaramYechury) April 22, 2021
“मी अत्यंत दुःखाने कळवू इच्छितो, की माझा मोठा मुलगा आशिष येचुरी याचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. आशिषवरील उपचारादरम्यान आमच्या मनात आशेचा किरण जागवणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो. डॉक्टर, नर्स, फ्रंटलाईन आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि आमच्या पाठीशी उभे राहिलेले असंख्य जण” अशा आशयाचे ट्वीट सीताराम येचुरी यांनी केले आहे.
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात गुरुवारी पहाटे सहा वाजता आशिष येचुरी यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना संसर्गानंतर दोन आठवड्यांपूर्वी आशिष येचुरींना होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते.
३४ वर्षीय आशिष येचुरी हे व्यवसायाने पत्रकार होते. राजधानी दिल्लीतील एका आघाडीच्या वर्तमानपत्रात ते सिनिअर कॉपी एडिटर म्हणून कार्यरत होते
हे ही वाचा:
सरकार आपली जबाबदारी झटकत आहे- उच्च न्यायालयाचे ठाकरे सरकारवर ताशेरे
मोदींचे आज जागतिक पर्यावरणीय बदल परिषदेत संबोधन
बंगालमध्ये मतदानासाठी पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे आवाहन
आता मध्य प्रदेशातही लसीकरण मोफत
६८ वर्षीय सीताराम येचुरी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव आहेत. जुलै २००५ मध्ये पश्चिम बंगालमधून त्यांची राज्यसभेवर खासदारपदी वर्णी लागली होती. सीताराम येचुरी यांचा विवाह बीबीसी हिंदीच्या माजी दिल्ली संपादक सीमा चिश्ती यांच्याशी झाला आहे. हा त्यांचा दुसरा विवाह आहे. आशिष हे त्यांच्या पहिल्या पत्नीपासूनचे पुत्र होते. त्यांना एक मुलगीही (अखिला येचुरी) असून ती युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबराला शिकवते.