24 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरराजकारणमाणिकराव कोकाटेंच्या मुलीच्या लग्नात कोरोना नियमांचा वाजला बँड

माणिकराव कोकाटेंच्या मुलीच्या लग्नात कोरोना नियमांचा वाजला बँड

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्याने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व सांगितले, घराबाहेर पडू नका नाहीतर लॉकडाऊन पुन्हा लावावा लागेल असे इशारे दिले पण त्यांच्या सरकारमधील नेते व आमदारच आपल्या नेत्याचे ऐकत नाहीत असे चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यात या बेशिस्तीचे दर्शन झाले. जणू हे लग्न सोडून संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना आहे की काय अशीच स्थिती होती.

गंगापूर धरणानजिकच्या एका पंचतारिकित रिसॉर्टमध्ये हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. पंचतारांकित व्यवस्थेत पार पडलेला हा विवाह सोहळा म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचे सर्व नियम मोडत साजरा झाला. खुद्द उपमुख्यमंत्री तसेच त्यांच्या जोडीला चार मंत्री या विवाहसोहळ्यास उपस्थित होते. बाकी आमदार, खासदार यांच्यासह कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. उघडपणे कोरोनाच्या नियमांना केराची टोपली या विवाह सोहळ्यात दाखविण्यात आली होती.

हे ही वाचा:

लसीकरणाचे तीनतेरा वाजवणारे आरोपी झाले १३

‘मा.मुं.चे ज्ञान अगाध’ भातखळकरांचा टोला

भाजपवर आरोप केल्याशिवाय संजय राऊत यांना जेवणच पचत नाही

वाहन उद्योगाला मार्ग सापडला

मुख्य म्हणजे ठाकरे सरकारमधील अनेक मंत्री सोहळ्यात उपस्थित होते. त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी सुद्धा या सोहळ्यात होते. पण कुणालाही कोरोनामध्ये असलेले नियम आठवत नव्हते. एकूणच काय तर सामान्यांना एक न्याय आणि आमदारांना दुसरा. लग्नसोहळ्यातील गर्दीवर आमदार महोदयांनी दिलेले उत्तर म्हणजे सर्वसामान्यांना ठोसाच होता.

आमदार कोकाटे म्हणाले, आमच्या प्रेमापोटी एवढे लोक उपस्थित होते. उपमुख्यमंत्री यांनाही हे नियम मोडल्याचे लक्षात आल्यावर, त्यांनी घडलेल्या प्रकारावर त्यांच्या शैलीत सारवासारवही केली. त्यामुळेच कोरोनाचे नियम मोडल्याची अप्रत्यक्ष का होईना कबुली अजित पवार यांनी दिली.

ठाकरे सरकार सतत लोकांना शहाणपण शिकवत असते. परंतु राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे यांना शहाणपण शिकवल्याचे अजूनतरी ऐकिवात नाही. कोकाटे यांच्या लग्नात अगदी उघडपणे कोरोना नियमांना पायदळी तुडवले तरीही कुठलीही कारवाई मात्र झाल्याची अजूनतरी कळले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा