जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात शुक्रवारी एक जुलूस पहायला मिळाला. तालुक्यातील एका स्थानिक दर्ग्याचा हा जुलूस होता. कोविड प्रतिबंधक सर्व नियमावली धाब्यावर बसवत या जुलूसला हजारो लोकांची गर्दी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे सत्ताधारी शिवसेना पक्षाचे आमदार चिमणराव पाटील हे देखील या जुलूस मध्ये सहभागी झाले होते. सत्ताधारी पक्षाच्या आमदार महोदयांच्या या बेजबाबदार वर्तनाबद्दल त्यांच्यावर टीकेची झोड उठवताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यात सर्व धार्मिक स्थळे बंद असताना आणि सार्वजनिक पद्धतीने उत्सवांवर बंदी घातली असताना हा दर्ग्याचा जुलूस प्रशासनाने कसा होऊ दिला असा सवाल विचारला जात आहे.
शुक्रवार, ३ सप्टेंबर रोजी जळगाव मधील पारोळा तालुक्यात एका स्थानिक दर्ग्याचा जुलूस भरला होता. या जुलूस साठी हजारोंच्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली. यावेळी कोविड निर्बंधांचा पार फज्जा उडाला. पण तरीही प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आल्याचे दिसले नाही. दुपारी तीन-साडे तीन पासून सुरू झालेला हा जुलूस रात्री दहा-साडे दहा पर्यंत सुरूच असल्याची माहिती मिळत आहे. या सात ते आठ तास चाललेल्या कार्यक्रमात कोविड नियमावलीचे कोणतेही पालन झालेले नाही. लोकांनी जुलूससाठी गर्दी तर केलीच पण अनेकांनी चेहऱ्यावर मास्क सुद्धा घातलेले नव्हते. हा संपूर्ण कार्यक्रम वाजत गाजत पार पडला. ढोल बडवले गेले. पण त्या आवाजानेही प्रशासनाला जाग आली नाही.
हे ही वाचा:
जावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा
भारताने गाठला परकीय चलन साठ्याचा उच्चांक
बोरिवलीत इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग, जीवितहानी टळली
गौहत्या करणाऱ्या जावेदला इलाहाबाद उच्च न्यायालयाने फटकारले
एकीकडे हिंदूंच्या सर्व सण, उत्सवांवर सरकारकडून निर्बंध घातले जात असताना काही विशिष्ट धर्मियांना अशी विशेष सवलत का दिली जाते? हा सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत. विशेष म्हणजे पारोळा येथे हा जुलूस सुरू असतानाच बाजूच्या तालुक्यात गणेश उत्सव मंडळांची बैठक प्रशासनामार्फत बोलवण्यात आली होती आणि त्यांनी कोरोना नियमांमुळे गणेशोत्सव साजरा करू नये या प्रकारची विनंती त्यांना करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही बैठक घेणाऱ्या धिकार्यांच्या अखत्यारित पारोळा तालुकाही येतो पण इथल्या त्या जुलूसकडे मात्र कानाडोळा करण्यात आला. तालुक्यातील काही जागृक सामाजिक कार्यकर्त्यांनी या जुलूसवर कारवाई करून तो ताबडतोब बंद करावा यासाठी प्रयत्न केले. पण सत्ताधारी पक्षाचे आमदारच सहभागी झाल्यामुळे बहुदा कोणाची कारवाई करायची हिम्मत झाली नसावी. या घटनेला आता २४ तासांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. पण तरिही अजून पर्यंत या जुलूसचे आयोजन करणाऱ्या आणि सहभागी झालेल्या नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याचे समोर आलेल्या नाही.
कार्यक्रमांची परवानगी फक्त टिपुसेनेला आहे का?
भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी या संपूर्ण विषयावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. “करोना काळात सर्व कार्यक्रमांना बंदी फक्त टिपूसेनेला परवानगी. शिवसेना आमदार चिमण पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात कोरोनाप्रूफ कार्यक्रम साजरा करण्यात आला.” असे ट्विट त्यांनी केले आहे.
करोना काळात सर्व कार्यक्रमांना बंदी फक्त टिपूसेनेला परवानगी. शिवसेना आमदार चिमण पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात कोरोनाप्रूफ कार्यक्रम साजरा करण्यात आला. pic.twitter.com/mITuHncIjZ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 4, 2021