कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ

कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ

अंटार्टिकामध्ये सुद्धा कोरोनाची लागण. चिलेच्या संशोधन केंद्रातील ३६ शास्त्रज्ञांना बाधा.

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग काही दिवस घट पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा वाढ झाली. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत आठ हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात ५० हजार ८४८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात १ हजार ३५८ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडाही आता तीन कोटींच्या पार गेला आहे. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

गेल्या २४ तासात भारतात ५० हजार ८४८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ३५८ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ६८ हजार ८१७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी २८ हजार ७०९ वर गेला आहे. देशात २ कोटी ८९ लाख ९४ हजार ८५५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ९० हजार ६६० रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर ६ लाख ४३ हजार १९४ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा:

२०२४ला मोदींना पराभूत करणे अशक्य, याची वागळेंनाच खात्री!

धक्कादायक! उंदरांनी कुरतडले बेशुद्ध रुग्णाचे डोळे

२० दिवसांच्या विक्रमी वेळेत भारतीय रेल्वेने बांधला उड्डाणपूल

उद्धव ठाकरे नाना पटोलेंवर नाराज?

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २९ कोटी ४६ लाख ३९ हजार ५११ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version