बीडमध्ये कोरोनाचा हाहाकार, सत्ताधारी मात्र गायब

बीडमध्ये कोरोनाचा हाहाकार, सत्ताधारी मात्र गायब

जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय तर दुसरीकडे रेमडीसीव्हर औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्राकडून आलेल्या लसीमध्ये बीड जिल्ह्याला सर्वात कमी लस मिळाल्याचा आरोप करत यासंदर्भात भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून खेद व्यक्त केला आहे. दरम्यान, बीडमध्ये सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचं हित माहीत आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बीडमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७२९ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर बाधितांची संख्या ३५ हजाराच्या आसपास गेली आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणा पुर्ण ताकदीने रूग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत असताना दुसरीकडे कोरोना रूग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लसदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रूग्णसंख्या वाढीत भर पडत आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रडत लक्ष्मी

पहिली महिला सरन्यायाधीश बनवण्याची वेळ आली आहे- सरन्यायाधीश शरद बोबडे

चिल्लर त्याला आणि नोटा बारामतीला, अनिल देशमुख प्रकरणी पडळकरांची टीका

माजी सीबीआय संचालक रणजीत सिन्हा यांचं निधन

बीड जिल्ह्यामध्ये मागच्या दोन दिवसापासून जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे या कोव्हिड सेंटर मध्ये जाऊन रुग्णाशी चर्चा करताहेत, प्रशासनासोबत बैठका घेऊन माहिती गोळा करत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे कुठे आहेत? असा सवाल भाजपा कार्यकर्ते सोशल मीडियातून विचारत आहेत.

Exit mobile version