पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात कोरोनाचे निर्बंध पायदळी तुडवण्यात आल्याने देशातील कोरोना संसर्गात मोठी वाढ झाली, अशी टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मात्र निवडणुका आणि कोरोना संसर्गाचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
“रुग्णवाढीचा संबंध निवडणुकांशी जोडणे योग्य नाही. ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या नाहीत त्या राज्यांत जास्त रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रात निवडणुका आहेत का? मग तिकडे साठ हजार आणि पश्चिम बंगालमध्ये चार हजार रुग्ण आहेत. यावर तुम्ही काय म्हणाल?” असा प्रतिसवाल अमित शाह यांनी केला.
देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्र सरकार घाईघाईने घेणार नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. तुर्तास घाईघाईने लॉकडाऊन करावे, अशी परिस्थिती नाही. कोरोना संसर्गाचा वेग प्रचंड आहे, पण या विषाणूवर आपण नक्की विजय मिळवू, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
“गेल्यावर्षी लॉकडाऊन लावला तेव्हा उद्देश वेगळा होता. त्यावेळी आमच्याकडे कोणतेही औषध किंवा लस नव्हती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. केंद्र सरकार तत्पर आहे.आम्ही सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहोत, दोन बैठकाही झाल्या आहेत. त्यावेळी मीदेखील हजर होतो. सर्वांच्या सहमतीने जे ठरेल त्याला अनुसरूनच आम्ही पुढे जाणार आहोत. परंतु, घाईगडबडीने देशभर लॉकडाऊन लागू करावा, अशी परिस्थिती सध्या दिसत नाही.” असे शाह म्हणाले.
हे ही वाचा:
मोदी सरकारकडून ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ सुरु
कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल
देशभरात आढळले अडीच लाखापेक्षा जास्त कोरोना रुग्ण
ठाकरे सरकारच्या कारभाराचा त्यांच्याच नेत्यांना वैताग
“लसीकरणासंदर्भात वैज्ञानिकांशीही चर्चा सुरू आहे. करोनाशी लढण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. कोरोना संक्रमण प्रसाराचा वेग प्रचंड असल्यानं लढा देणं थोडं कठीण आहे. पण, मला विश्वास आहे की, आपण त्यावर विजय मिळवू.” असंही अमित शाह म्हणाले.