कोविडने दिले उंदराना मोकळे रान…

कोविडने दिले उंदराना मोकळे रान…

महापालिकेने मुंबईतील २२ प्रभागांमध्ये उंदीरनाशकांसाठी खासगी संस्थांची नियुक्ती केली होती. मात्र, कोविड काळात फक्त १२ प्रभागांमध्येच उंदीर मारण्यात आल्याची माहिती प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मांडली आहे. उर्वरित दहा प्रभागनमध्ये कोविड महामारीमुळे उंदरांना सुटका मिळालेली आहे.

मुंबई महापालिकेने मार्च २०२० मध्ये मुंबईतील २२ प्रभागांमध्ये उंदीर नष्ट करण्यासाठी खासगी संस्थांची नियुक्ती केली होती. मात्र, मार्च मध्ये भारतात कोविड-19 चा शिरकाव झाला आणि सर्व कामे ठप्प झाली. त्यामुळे फक्त १२ प्रभागांमध्येच उंदीर मारायचे काम पूर्ण झाले होते. मार्च २०२० ते जानेवारी २०२१ या ११ महिन्यानंतर पुन्हा त्याच प्रभागातील संस्थाना मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ डिसेंबर २०२१ पर्यंत देण्यात आली, अशी माहिती महापालिकेने स्थायी समितीच्या पटलावर मांडली आहे.

महापालिकेने त्या दरम्यानच्या काळात झालेल्या खर्च प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीसाठी स्थायी समितीकडे मांडला होता. त्या प्रस्तावात एक कोटी खर्च झाल्याचे म्हटले आहे. त्यावर भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. कोणत्या विभागात किती उंदीर मारले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यानुसार प्रशासनाकडून ही माहिती सादर करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

‘भुजबळांची बेनामी मालमत्ता पाहण्यासाठी गेलो म्हणून एफआयआर

आपल्या गाडीसमोर पु्न्हा पुन्हा बाईकस्वार कसा आडवा येतो?

राजस्थानमध्ये वऱ्हाडाच्या कारला अपघात…नवरदेवासह नऊ जण ठार

तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना का भेटत आहेत?

महापालिकेने १२ प्रभागातील मार्च २०२० पासून जानेवारी २०२२ पर्यंत चार लाख १३ हजार ४९२ उंदरांचा खात्मा केला आहे. जानेवारी २०२२ मध्ये २५ हजार १८ उंदरांसाठी चार लाख ९८ हजार ४३७ रुपयांचा खर्च केला आहे. तर फेब्रुवारी ते डिसेंबर २०२१ या काळात दोन लाख ३२ हजार ९०४ उंदराचा खात्मा केला, त्यासाठी ४६ लाख ८२ हजार खर्च झाला आहे.  मार्च २०२० ते जानेवारी २०२१ या काळात एक लाख ५५ हजार ५७० उंदीर मारण्यात आले, त्यासाठी २७ लाख ६१ हजारांचा खर्च केला गेला आहे.

Exit mobile version