राहुल गांधींसह कर्नाटकच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना न्यायालयाचा समन्स

बंगळुरू न्यायालयाने बजावले समन्स

राहुल गांधींसह कर्नाटकच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना न्यायालयाचा समन्स

कर्नाटकमध्ये काँग्रेसने बहुमत प्राप्त करून सत्ता आपल्या हाती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री पदावरून कर्नाटकात नाराजी नाट्य रांगल्याने काँग्रेसचे वरिष्ठ नेते पेचात पडले होते. त्यावर तोडगा निघताच आता कर्नाटकमधील नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका चालू असताना काँग्रेसकडून प्रचार करताना भाजपावर टीका करण्यात आली होती. याप्रकरणी बंगळुरू न्यायालयाने बुधवार, १४ जून रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाविरोधात खोट्या जाहिराती आणि बदनामीकारक प्रचार केल्याप्रकरणी न्यायालयाकडून या तिन्ही नेत्यांविरोधात हे समन्स देण्यात आले आहे.

भाजपाचे प्रदेश सचिव एस केशवप्रसाद यांनी ९ मे रोजी या तिन्ही नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. तत्कालीन भाजपा सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये ४० टक्के कमिशन घेऊन राज्यातून दीड लाख कोटी रुपयांची लूट केल्याचा दावा करण्यात आला होता, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं. या जाहिरातीमुळे भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी विशेष न्यायालय पुढील सुनावणी २७ जुलै रोजी करणार आहे.

राहुल गांधी यांच्यावर याआधीही मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची खासदारकीही गेली आहे. त्यामुळे या समन्सनंतर सिद्धरामय्या आणि डीके यांच्या अडचणी वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा:

 

… म्हणून कोलकातामधील विमानतळावर लागली आग

‘बिपरजॉय’चा असाही वादळी विक्रम

सुसज्ज गुजरात करणार बिपरजॉयचा सामना

प्रकरण काय?

कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी भाजपा ४० टक्के कमिशन घेणारे सरकार असा उल्लेख केला होता. त्याचबरोबर त्यांनी भाजप हे भारतातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली होती.

Exit mobile version