काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचं ट्विटर खातं कथीत कॉपीराइट उल्लंघन केल्याप्रकरणी ब्लॉक करण्याचे निर्देश बंगळुरूतील एका न्यायालयाने दिले आहेत. भारत जोडो यात्रेमध्ये KGF Chapter 2 चित्रपटातील म्युझिकचा वापर करण्यात आल्याने कॉपीराईटच्या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेअंतर्गत ते विविध राज्यात जातं आहेत. त्यांच्या या यात्रेच्या व्हिडीओजसाठी गाण्यांचा वापर केला जातं आहे. त्यामुळे एमआरटी म्युझिकने कॉपीराइट उल्लंघन केल्याची याचिका दाखल केली. याचिकाकर्त्यांनी या वादावरील एक सीडी तयार केली असून यामध्ये त्यांच्या कॉपीराइट केलेल्या कामाची मूळ प्रत, बेकायदेशीरपणे सिंक्रोनाइझ केलेल्या प्रतीसह न्यायालयात सादर केली.
न्यायालयापुढे उपलब्ध असलेल्या या प्राथमिक माहितीच्या आधारे न्यायालयाने निकाल दिला आहे. प्राथमिकदृष्ट्या हे स्पष्ट होतं की, अशा प्रकारे जर संगिताचा बेकायदा वापर केला गेला तर त्यामुळं सिनेमॅटोग्राफी चित्रपट, गाणी, म्युझिक अल्बम इ. च्या वापरास प्रोत्साहन मिळेल त्यामुळं मूळ काम करणाऱ्याचं कधीही भरून न येणारं नुकसान होईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उचलेगिरीला प्रोत्साहन मिळू शकते, असे न्यायालयाने नमूद केले आहे.
[BREAKING] Bengaluru court orders blocking Twitter handles of Congress party, Bharat Jodo Yatra in copyright infringement suit
Read story: https://t.co/GY7GkLjhH8 pic.twitter.com/fQL3dPDaMN
— Bar & Bench (@barandbench) November 7, 2022
हे ही वाचा:
सत्तारांचे समर्थन नाही, पण महाराष्ट्रात सिलेक्टिव्हपणा केला जातो
नीलमताई गॅरेण्टी उद्धव ठाकरे यांची तरी आहे का?
अरबी भाषा शिक्षकाकडून ८ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार
अब्दुल सत्तारांच्या त्या अपशब्दावरुन राजकीय राडा
न्यायालयाने काँग्रेसच्या ट्विटरला त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून तीन लिंक काढून टाकण्याचे निर्देश दिले. यासोबतचं काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल तात्पुरतं ब्लॉक करण्याचे आदेशसुद्धा न्यायालयाने दिले आहेत. KGF Chapter 2 अर्थात एमआरटी म्युझिक विरुद्ध इंडियन नॅशनल काँग्रेस असा हा खटला आहे.