महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंबंधी महत्वाच्या मुद्द्यांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सत्तासंघर्षाची सुनावणी ही सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर होणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या असल्याने ही सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आज, १ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता या मुद्द्यांवर सुनावणी होणार आहे.
न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांचा या घटनापीठात समावेश आहे.
सर्वोच्च न्यायलायत पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्राचे प्रकरण असणार आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आज या प्रकरणातील मूळ मुद्द्यांवर युक्तिवाद होणार आहे. तसेच शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याबद्दल निवडणूक आयोगाने जी कारवाई केली त्याचाही उल्लेख आजच्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, घटनापीठाचे कामकाज सलग होणार की नाही? याबद्दल अजून स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात आजची सुनावणी अत्यंत महत्वाची असल्याचं म्हटले जातं आहे. या प्रकरणावर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा:
फडणवीसांच्या स्पष्टीकरणावर आदित्य ठाकरेंकडून पुरावे नाहीतच
भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू
मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी
मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश
दरम्यान, २७ सप्टेंबर रोजी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाच्या कामकाजात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचे प्रकरण आले नाही. त्यामुळे याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.