देशाला कंडक्टर सारखा ‘आगे बढो’ म्हणणारा पंतप्रधान हवा

देशाला कंडक्टर सारखा ‘आगे बढो’ म्हणणारा पंतप्रधान हवा

भारत देशाला कंडक्टर सारख्या पंतप्रधानाची गरज आहे अशी भावना महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. देशाला आगे बढो, आगे बढो म्हणणारा पंतप्रधान हवा असे मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केले. बेस्टच्या एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.

शनिवार, ७ ऑगस्ट रोजी बेस्टचा ७४ वा ‘बेस्ट दिन’ पार पडला. या निमित्ताने बेस्ट उपक्रमाच्या पर्यावरण स्नेही इलेक्ट्रिक बस गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. तर त्यासोबतच माहिम येथील पुनर्विकसित बस स्थानकाचाही लोकार्पण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम कार्यक्रम संपन्न झाला.

हे ही वाचा:

तालिबानने एक शहरही काबीज केले

दरडग्रस्तांना मदत करण्यात ठाकरे सरकार अपयशी

बजरंगमुळे ब्रॉंझरंग

राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का?

या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी बेस्ट बद्दलच्या त्यांच्या आठवणी मांडल्या. १८७४ ते २०२१ हा बेस्टचा मोठा प्रवास आहे असे ते म्हणाले. तर सुरुवातीला बेस्ट ही घोडागाडीत होती आणि ट्रामच्या आठवणी आपल्या अजूनही आहेत असे त्यांनी सांगितले माँ आणि बाळासाहेब आपल्याला ट्राम मधून फिरायला घेऊन जात असत असे त्यांनी सांगितले. आता ट्राम जाऊन बेस्टची इलेक्ट्रिकल बस आली आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

याच वेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाच्या पंतप्रधानांबद्दल एक वक्तव्य केले. देशाचे पंतप्रधान हे कंडक्टर सारखे असावेत जे सतत आगे बढो, आगे बढो म्हणत असतील असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याची लोकांमध्ये सध्या चांगलीच चर्चा रंगली असून सोशल मीडियावर लोक त्यांना ट्रोल करतानाही दिसत आहेत.

Exit mobile version