कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, काँग्रेस आघाडीवर

आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, काँग्रेस आघाडीवर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे काही कल हाती आले असून यात काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र आहे. २२४ पैकी ११८ जागांवर काँग्रेस आघाडीवर असून ७१ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. कल सातत्याने बदलत असून काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस दिसून येत आहे.

आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कर्मनाटकच्या जनतेने सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात दिल्या आहेत हे आज समजणार आहे. आज दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

खगोल भौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांना जीवनरगौरव पुरस्कार

ऍसिड हल्ल्यातून बचावलेली मुलगी टॉपर

किशोर आवारे हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचे नाव

आशिष शेलार यांच्याकडून मुंबईतील नाले सफाईची पाहणी

कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८ मध्ये भाजपाने भाजप १०४ जागांसह बाजी मारली होती. काँग्रेस ७८ जागांसह दुसऱ्या स्थानी होता, तर जनता दल (सेक्युलर) ३८ जागांसह तिसऱ्या स्थानी होता. यंदाचा कौल कोणाच्या बाजूने लागणार याकडे लक्ष असणार आहे.

Exit mobile version