जलसंपदा विभाग आता खाजगीकरणाच्या वाटेवर असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. राज्याचा जलसंपदा विभाग म्हणजे सोन्याची खाण असे म्हटल्यास वावगं ठरू नये. राज्याच्या अनेक विभागांपैकी सर्वात श्रीमंत विभाग म्हणून जलसंपदा विभागाची ओळख आहे. परंतु आता या विभागाने मनुष्यबळ कमी करण्याचे ठरवले आहे. तसेच याअंतर्गत आता मोठी कपात होणार आहे. तब्बल एक दोन हजार नाही तर, १० ते १५ हजार कर्मचारी यामुळे बेरोजगार होणार आहे.
त्यामुळेच आता या विभागातील पदभरती सरसकट बंद होणार आहे. तसेच जलसंपदा विभागाच्या खाजगीकरणाचा घाट सरकारने घालून एक धाडसी पाऊल उचलेले आहे. दर दहा वर्षांनी शासनाच्या कामाचा लेखाजोखा मांडला जातो. याआधी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणामध्येही भरती प्रक्रिया पूर्णपणे थांबवली होती.
आता वेळ आलीय जलसंपदा विभागाची. त्याच अनुषंगाने आता जलसंपदा या विभागातील वर्ग तीन व चारची पदे जसे कनिष्ठ लिपिक,टंकलेखक, कालवा निरीक्षक,मोजणीदार,शिपाई,चौकीदार, वाहनचालक, धरणांची सुरक्षा करणारे गार्ड या पदांची भरती पूर्णपणे बंद होणार आहे.
हे ही वाचा:
…आणि असा घातला त्याने मित्रालाच गंडा
अमेरिकेच्या उप परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यात या महत्त्वाच्या विषयावर करणार चर्चा
मंदिरे तर उघडणार; पण प्रसाद, फुलांवर फुली
अमेरिकेच्या उप परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यात या महत्त्वाच्या विषयावर करणार चर्चा
जलसंपदा विभागामध्ये अनेक पिढ्यान् पिढ्या काम करणारे होते. शिपाई असणारे स्वतःच्या मुलाला नोकरीला लावत होते. त्यामुळे कायमस्वरूपी नोकरीची व्यवस्था होत होती. परंतु आता मात्र तसे होणार नाही. त्यामुळे एकूणच काय तर कायमस्वरूपी नोकरीचे दिवस आता संपले आहेत हे सत्य आहे.