28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारणकोस्टल रोड प्रकल्पाच्या सल्लागाराचीच होतेय कमाई

कोस्टल रोड प्रकल्पाच्या सल्लागाराचीच होतेय कमाई

Google News Follow

Related

आगामी मुंबई महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेला विरोधी पक्षाने घेरण्यास सुरुवात केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा दावा भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. सल्लागाराला नियमबाह्य पद्धतीने अधिक रक्कम देण्यात आली असून कॅगनेही त्यावर ताशेरे ओढले आहेत.

आशिष शेलार यांनी आज (७ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन महापालिकेच्या कारभारावर हा आरोप केला आहे. मुंबई महानगर पालिका ठरवून गोंधळाची स्थिती करत आहे. मुंबईतील कोस्टल रोड प्रोजेक्ट बाबत मुंबईत काय चालले आहे? असा सवाल करतानाच महापालिकेने कोस्टल रोडच्या सल्लागारांना अधिक रक्कम दिली आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. यापूर्वीही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळी कोस्टल रोड प्रकल्पात भ्रष्टाचार होत असल्याचे मी सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, आजही या प्रकल्पात अफरातफरी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

‘पवार कुटुंब ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ आहेत’

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन

‘वरळी सिलेंडर स्फोट प्रकरणी शरम असल्यास आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा’

पेप्सीकोला शिकवला धडा; बटाट्याचे पेटंट रद्द

प्रकल्प व्यवस्थापक असलेल्या सल्लागाराला बेकायदेशीर मदत केली जात असून त्यांना जास्तीचा पैसा दिला जात असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. वेगवेगळ्या पॅकेजमधील तीन कंत्राटदार असून त्यांना अवास्तव बिलं दिली जात आहेत. मात्र, आरोप केले तेव्हा पालिकेने असे काही नसल्याचे म्हटले होते. मात्र, पालिकेकडून बेकायदेशीर बिले दिली जात आहेत. कंत्राटदारांना विशेष मदत केली जात आहे. मुंबईकरांच्या पैशांची लूट केली जात आहे.

कॅगने कोस्टल रोडवर काय ताशेरे ओढले त्यावर शेलार म्हणाले की, कोस्टल रोडचा डीपीआर हा अतिशय चुकीचा असल्याचे कॅगने म्हटले आहे. डीपीआर करताना ट्रॅफिकचे मूल्यमापन केले गेले नाही, असे कॅगने म्हटले आहे, असे त्यांनी सांगितले. कॅगने पर्यावरण संबंधाच्या मुद्द्यावरूनही आक्षेप घेतले आहेत. या प्रकल्पात पर्यावरणाबाबतची सजगता पाळली नसल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा