29 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरराजकारणआम्ही आत्महत्या करायची का? कोविड योद्ध्याचा महाराष्ट्र सरकार विरोधात आक्रोश

आम्ही आत्महत्या करायची का? कोविड योद्ध्याचा महाराष्ट्र सरकार विरोधात आक्रोश

Google News Follow

Related

आम्ही आत्महत्या करायची का? असा संतप्त सवाल विचारत चंद्रपूरमधील एका कोविड योद्ध्याने ठाकरे सरकार विरोधात आवाज उठवला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रक्ताने पत्र लिहून या कोविड योद्ध्याने आपली व्यथा मांडली आहे.

कोरोनाच्या या महामारीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या योद्ध्यांचे राज्य सरकार मार्फत पगार थकवले जात आहेत. आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी गेले शंभरपेक्षा अधिक दिवस चंद्रपूरमध्ये कोविड योद्धे आंदोलन करत आहेत. पाचशेपेक्षा अधिक योद्धे या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कंत्राटी कामगार असलेल्या या कोविड योद्ध्यांचे हे आंदोलन सुरू असले तरी महाराष्ट्र सरकार या आंदोलनाची कोणतीच दखल घेताना दिसत नाहीये. अखेर एका आंदोलक कामगाराने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहे.

गेल्या अकरा महिन्यांपासून आम्हाला पगार नाहीत. आम्ही जगायचे कसे? आम्ही आत्महत्या करायची का? असे संतप्त सवाल या आंदोलनकर्त्याने विचारले आहेत. तर आपल्या जिवाचे काही बरे वाईट झाल्यास वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा तसेच ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंतीही या कोविड योद्ध्याने केली आहे.

हे ही वाचा:

सीरम इन्स्टिट्यूट करणार स्पुतनिक व्ही चे उत्पादन?

शरद पवार यांच्यामुळेच आरक्षण मिळालं नाही

राज्य सरकार बारावीची परीक्षा घेण्यास अनुत्सुक

पुलवाम्यात भाजपा नेत्याची दहशतवाद्यांकडून हत्या

चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पाचशेच्या जवळपास कंत्राटी कामगारांचे गेल्या अकरा महिन्यांचे वेतन थकवले गेले आहे. गेल्या वर्षभर या महाविद्यालयात नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली नाही . कंत्राटदार नसतानाही कंत्राटी कामगारांकडून मात्र कोरोना आपत्तीमध्ये कामे करून घेण्यात आली. पण कंत्राटदार नसल्यामुळे कामगारांचे पगार कोणाच्या मार्फत द्यायचे? असा यक्षप्रश्न सरकारपुढे आहे त्यामुळे या कामगारांचे पगार थकवण्यात आले आहेत.

तर या साऱ्या प्रकारावरून भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “मंत्र्यांच्या गाड्या बंगले यावर कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या निर्लज्ज महा विकास आघाडी सरकारने जीवावर उदार होऊन कोविड काळात काम केलेल्या योद्धयांचे वेतन थकवले आहे.” असा हल्लाबोल भातखळकर यांनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा