26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरराजकारणचितांचा बाजार

चितांचा बाजार

Google News Follow

Related

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर देशभरात या संसर्गामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते आहे. स्मशानात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. चिता धडधडत आहेत. पण या चितांवर आपल्या स्वार्थाची पोळी भाजणारेही मागे नाहीत. त्यांच्यासाठी ही आयतीच संधी. मृत्युमुखी पडणाऱ्यांशी, त्यांच्या दुःखी नातेवाईकांशी त्यांचे सोयरसुतक नाही. त्यातूनही आपली प्रसिद्धी कशी होईल, कसे लोकांना आकर्षित करता येईल, असे अथक प्रयत्न ते करत असतात. या चितांची छायाचित्रेही चांगल्या किमतीला विकली जात आहेत. छायाचित्रांचा पुरवठा करणाऱ्या नामांकित कंपन्याही या चितांचे फोटो विकताना फायद्याचा विचार करत आहेत.

हे ही वाचा:

इस्रायलकडून भारताला वैद्यकीय मदत

केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या गाडीवर हल्ला

दाभोलकर हत्त्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला जमीन मंजूर

१ जूनमध्ये मान्सून सरी बरसणार

मोठ्या आकारातील छायाचित्रासाठी तुम्हाला २३ हजार रुपयांपर्यंत मोजावे लागू शकतात. केवळ एवढेच नाही तर ही छायाचित्रे वेगवेगळ्या अँगलने काढली गेली आहेत. एरियल व्ह्यू, साईड व्ह्यू, कधी नातेवाईकांचे दुःख दाखविणारी, कधी स्मशानातील कर्मचाऱ्यांची होणारी धावपळ दाखविणारी… अर्थात, ही छायाचित्रे विकत घेणारेही आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात असे छायाचित्र वापरताही येईल, पण राजकारणासाठीही अशा पेटत्या चितांचा उपयोग करण्याची शक्कलही काही लोक लढवतात. मग कुठल्यातरी राजकारणी माणसाचा फोटो दाखवून बाजुला अशा चितांचा फोटो जोडला की झाले! खरे तर, करोनाचा प्रादुर्भाव सगळ्यांच राज्यांत आणि जिल्ह्यात आहे. स्मशानांत सगळीकडेच ही अवस्था आहे. त्यासाठी कुणा एका राजकारण्याला जबाबदार धरता येणार नाही. मागे उत्तर प्रदेशात पेटलेल्या चितांचा असा फोटो व्हायरल करून बघा योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात काय अवस्था आहे असा बभ्रा करण्यात आला. अशा लोकांचे या मृत्युमुखी पडलेल्यांशी किंवा त्यांच्या कुटुंबियांशी काही देणेघेणे नाही. त्यांना यातूनही आनंद मिळवायचा असतो. कार्टूनिस्टही त्यात मागे नाहीत. मोदींचे भाषण करतानाचे व्यंग काढून त्या मागे चिता जळत असतानाचे चित्र काढायचे आणि आपला कंडू शमवायचा, अशी यांची अवस्था. बरे या निवडणुकांच्या प्रचारात सगळ्या पक्षांनी प्रचार केला. केवळ एकटे मोदीच सगळ्या प्रचारात होते असे नाही. ममता बॅनर्जींनीही बंगाल पिंजून काढला होता. पण त्यांचे चित्र काढले का कुणी? कोरोना वाढत असताना राहुल गांधी केरळमध्ये प्रचार करतानाचे कुणी काढले का व्यंग? एकूणच या पेटत्या चितांचा उपयोग आपल्या व्यंगचित्राला प्रसिद्धी देण्यासाठी कसा करता येईल, एवढाच विचार त्यामागे होता.
खोडसाळपणा हा चीनचा स्थायीभाव आहे. नुकतेच चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या सोशल मीडिया हँडलवर एक छायाचित्र चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. एका बाजुला चीनमधील रॉकेट लाँचरमधून निघणारे आगीचे लोळ आणि बाजुच्या छायाचित्रात भारतातील एका स्मशानभूमीत धडाडणारी चिता असे छायाचित्र अपलोड करून चीनने आपली असंवेदनशीलताच दाखवून दिली. त्याविरोधात मग संतापाची लाट उसळली आणि शेवटी ही पोस्ट रद्द करावी लागली. हा पण यातलाच प्रकार. भारताला कसे लक्ष्य करता येईल हा काही देशांचा हरतऱ्हेने प्रयत्न सुरू असतो. अन्य देशांचे ठीक आहे, आपल्या देशातील काही विचारवंत, तथाकथित पुरोगामी मंडळीही अशा कामात आघाडीवर असतात. परदेशातील वर्तमानपत्रात भारतातील एखाद्या स्मशानभूमीतील पेटत्या चितांचा फोटो छापून आला की, यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. मग ते छापलेले छायाचित्र शेअर करण्यासाठी अहमहमिका लागते. परदेशातील वर्तमानपत्रानेही कशी दखल घेतली आहे आपल्या देशातील अवस्थेची हे सांगण्यापेक्षा मोदींचे सरकार असल्यामुळे कशी अवस्था आहे, हे यांना सांगायचे असते. जळणाऱ्या चिता आणि मृत्युमुखी पडलेल्यांशी कोणतीही संवेदना त्यांना नाही. वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स अशा वर्तमानपत्रांनी भारताविरोधात आर्टिकल छापले की, ते प्रथम त्यांच्या संपादकाच्या आधी भारतात वाचले जात असावे. ते इथे लगेच शेअर केले जाते. त्यामागेही उद्देश असतो तो मोदींच्या सरकारला लक्ष्य करणे. तिथे काही चांगले छापले तर मात्र ते अजिबात शेअर होत नाही.
काही महिन्यांपूर्वी शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने अमेरिकेतून काही सेलिब्रिटींना नाही का शेतकऱ्यांचा उमाळा आला होता. त्यांच्यातलीच ही गत आहे. दुसऱ्या देशात काय घडते आहे, यात नाक खुपसण्याची आणि वाईट काही घडत असेल तर त्यातच आनंद मानण्याची ही एक वृत्ती आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही तेव्हा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. शेतकऱ्यांच्या प्रती असलेला तो कळवळा वगैरे काही नव्हता तर शेतकरी आंदोलनाची चर्चा सुरू आहे ना त्यात आपलेही हात धुवून घेऊ आणि तेवढीच प्रसिद्धी मिळवू यापेक्षा दुसरा कोणताही उद्देश असू शकत नाही. त्याला मग आपल्याकडे पाठिंबा मिळाला. त्यामागे शेतकऱ्यांच्या प्रती आदर, अभिमान वगैरे नाही तर शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून केंद्रातील सरकारवर कसा निशाणा साधता येईल हाच उद्देश. आज ते शेतकरी आंदोलन कुठे आहे आणि त्याला पाठिंबा देणारे कुठे आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. कारण आज त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातून आपल्याला काहीएक फायदा होण्याची चिन्हे नाहीत तेव्हा त्यांच्याकडे ढुंकूनही पाहायला या विचारवंतांना वेळ नाही. शेतकऱ्यांच्या आडून आपला स्वार्थ साधणारे असोत की चिंताचे फोटो व्हायरल करून आपले इप्सित साध्य करणारे असोत सगळे एकाच माळेचे मणी आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा