लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान ७ मे रोजी पार पडणार असून सर्व राजकीय पक्षांच्या सांगता सभा आज पार पडल्या.या निवडणुकीत अनेक व्यक्तींची प्रतिष्ठा पणाला लागली असून कुटुंबातीलच व्यक्ती उमेदवार म्हणून एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत.तशीच लढत बारामतीमध्ये होणार आहे.बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार उभ्या आहेत.दरम्यान, बारामती येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ महायुतीची सांगता सभा पार पडली. यावेळी अजित पवारांनी रोहित पवार यांची नक्कल करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
बारामतीत प्रचार सभेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, नवी पिढी जोपर्यंत जबाबदारी घेत नाही तो पर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असे शरद पवारांचे शब्द आहेत.रोहित पवार पुढे भावून होऊन म्हणाले की, साहेब मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही असे पुन्हा म्हणून नका, तुम्ही आमचे जीव, आत्मा आहात.यावेळी रोहित पवार यांच्या डोळ्यात पाणी आले होते.दरम्यान, रोहित पवारांच्या भावनिक वक्तव्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नक्कल केली आहे.शेवटच्या क्षणाला काही लोक भाविनक करण्याचा प्रयत्न करतात, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
“यंदाच्या निवडणुकीत उबाठाच्या मशालीची चिलीम होणार”
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू!
गुजरातवरील विजयामुळे बेंगळुरूच्या ‘प्लेऑफ’मध्ये जाण्याच्या आशा जिवंत!
‘रोहित वेमुलाच्या मृत्यूचे राजकारण केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवारांच्या भाषणावर प्रत्युत्तर देत म्हणाले की, शेवटच्या सभेत कुणीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, मी तुम्हाला हे आधीच सांगितले होतं. आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं, मग मी पण काढून दाखवतो’. अरे मला मतदान द्या.ते पुढे म्हणाले की, ही असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाहीत.तुम्ही तुमचं काम दाखवा, तुमचं खणखणीत नाणं दाखवा..हे काय?.हा म्हणजे रडीचा डाव, हे असलं चालत नाही.अरे यांना जिल्हा परिषदेची तिकीट आम्ही दिली. गळ्याची आण घेऊन सांगतो, साहेब सांगत होते, अजिबाद देऊ नको. मी साहेबांचं ऐकलं नाही. मी तिकीट दिलं.त्यामुळे आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजले आहेत. तुम्ही आमच्यावर टीका करता. तुझ्यापेक्षा कितीतर उन्हाळे-पावसाळे बघितले आहेत”, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.