केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्या ताफ्यावर हल्ला

केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्या ताफ्यावर हल्ला

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार करत असताना शेखावत यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप होत आहे. गुरुवारी रात्री पश्चिम बंगालमधील दक्षिण कोलकाता भागात हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे.

देशात सध्या पाच विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पश्चिम बंगालमधील ममताराज संपवून तिथे ‘कमळ’ उमलवण्याचा भारतीय जनता पार्टीने चंग बांधला आहे. यासाठी भारतीय जनता पार्टी खूपच आक्रमकपणे प्रचार करताना दिसत आहे. पण बंगालच्या या रणांगणात राजकीय हिंसेच्याही बऱ्याच घटना पुढे येताना दिसत आहेत. आल्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर हल्ल्यांच्या घटना समोर येत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हा हिंसेचा नंगानाच करत असल्याचा आरोप होत आहे.

हे ही वाचा:

ममतांच्या भवानीपूरमध्ये अमित शहांचा झंझावात

भवानीपूरमध्ये तृणमूलच्या गुंडांचे शेवटचे प्रयत्न उघड

महाराष्ट्रात तीन आठवड्याचा कडक लॉकडाऊन?

ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेला नाहक त्रास

गुरुवारी अशीच एक हिंसेची नवी घटना समोर आली. केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार गजेंद्र शेखावत हे दक्षिण कोलकाता भागात प्रचार करत होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात त्यांच्या ताफ्यातील गाड्यांच्या काचा फुटलेल्या पाहायला मिळतात तर काही कार्यकर्त्यांनाही दुखापत झाली आहे. स्वतः मंत्रीमहोदयांना या हल्ल्यात दुखापत झालेली नाही. तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान गुरुवारी पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभा क्षेत्रामध्येही तृणमूल काँग्रेस पक्षाच्या गुंडांकडून भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. यावेळी पोलीस प्रशासन मुकदर्शकाच्या भूमिकेत असल्याचं चित्र समोर आलं आहे. भाजपाचे राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी याविषयी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

Exit mobile version