मंगळुरू जंक्शनला सावरकरांचे नाव देण्यावरून वाद

मंगळुरू जंक्शनला सावरकरांचे नाव देण्यावरून वाद

मंगळुर पालिकेत भाजपाने सुरतकल जंक्शनला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला असला तरी त्याला मोठा विरोध होत आहे. हे प्रकरण सध्या चांगलेच तापले आहे.

सदर प्रस्ताव भाजपाचे आमदार भरत शेट्टी यांनी ठेवला आहे. पण काँग्रेस, एसडीपीआय या पक्षांनी मात्र या प्रस्तावाला नेहमीप्रमाणेच विरोध केला आहे.

यासंदर्भात भरत शेट्टी टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात की, सावरकर यांनी भारतासाठी प्रचंड त्याग केला. ते स्वतःसाठी कधीही जगले नाहीत. स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला मग अशा व्यक्तीच्या त्यागाची दखल घ्यायला हवी. विरोधक विरोध करत असेल तर त्यांनी आधी इतिहास तपासला पाहिजे. सावरकर हे वादग्रस्त नेते नव्हते तर स्वातंत्र्यसेनानी होते.

बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनीही या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. प्रदीप सरिपल्ला या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने म्हटले आहे की, जंक्शनला नाव देण्याबरोबरच पुतळ्याचेही अनावरण व्हायला हवे. ते सच्चे स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांनी खूप मोठा त्याग देशासाठी केला आहे. त्यांची ओळख पुढच्या पिढीला व्हावी म्हणून त्यांचे नाव जंक्शनला द्यायला हवे.

 

हे ही वाचा:

लक्ष्मीपूजन करतानाच कुटुंबावर अंदाधुंद गोळीबार! ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

‘शिवसेनाप्रमुखांनी कधीही खंजीर खुपसून सत्ता स्थापन केली नाही’ म्हणणारे आता काय करतायत?

ठाकरे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही, माझं चॅलेंज आहे

उत्तरप्रदेश, हरियाणानंतर मध्यप्रदेशात येणार ‘हा’ कायदा

 

यावर विरोधी पक्षाकडून जोरदार आक्षेप घेण्यात येत आहे. राजकीय फायदा उठविण्यासाठी हे केले जात आहे, असा आरोप एसडीपीआयने केला आहे. कर्नाटकातील स्वातंत्र्यसेनानींची नावे का ठेवत नाही असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

यावर भाजपा नेते एस. प्रकाश म्हणतात की, सावरकर हे देशासाठी लढले. कुणा एका राज्यासाठी ते लढले नाहीत. पण त्यांचा सन्मान याआधी कुणीही केला नाही. विक्रम संपत यांनी सावरकर यांच्यावर प्रदीर्घ लेखन केले आहे. त्यात अनेक गैरसमज त्यांनी दूर केले आहेत. ते एकदा काँग्रसेच्या नेत्यांनी वाचावे.

Exit mobile version