तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मृणालिनी मंडल मैती यांचा पिस्तुल घेऊन काढलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. ज्यामुळे मंगळवारी राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
मृणालिनी मंडल मैती, जुन्या मालदा पंचायत समितीच्या अध्यक्षा आणि मालदा जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या महिला मंडळाच्या वरिष्ठ नेत्या, कार्यालयात सरकारी अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसलेल्या असताना पिस्तुल घेऊन फोटो काढला. फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपने तृणमूल काँग्रेसवर हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. त्यावर टीएमसीने मैती यांना फटकारले आहे आणि पिस्तुल खरे आहे की खोटे हे शोधण्यासाठी चौकशीची मागणी केली आहे.
भाजप मालदा जिल्हाध्यक्ष गोविंदा चंद्र मंडल म्हणाले, ” ही तृणमूलची संस्कृती आहे. पोलिसांनी तपास केला तर त्यांच्याकडे पिस्तुलांपेक्षा बरेच काही सापडेल. या लोकांकडे बंदुका, बॉम्ब आणि एके- 47 देखील सापडतील. मला खात्री आहे की ममता बॅनर्जींनीही तो फोटो पाहिला असेल पण त्या कोणतीही कारवाई करणार नाहीत.”
हे ही वाचा:
कोण आहेत देशातील पहिले सीडीएस बिपिन रावत?
बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला घातपात की अपघात?
भाडोत्री गुंडांनी असभ्य वर्तन, शिवीगाळ केल्याची भाजपा महिला नगरसेविकांची तक्रार
अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचाही चीनच्या ऑलिंपिकवर बहिष्कार
त्यावर तृणमूल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कृष्णेंदू नारायण चौधरी म्हणाले की, मला वाटते की ही खरी बंदूक आहे, परंतु पोलिसांनी या घटनेची चौकशी केली पाहिजे. यामुळे नेत्याची प्रतिमा खराब होत आहे, असे ते म्हणाले. मैती या वारंवार वादात सापडल्या आहेत. या प्रकरणी उत्तरासाठी मैती यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता परंतु, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तिच्या पतीवर सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करण्यासह अनेक आरोप लावण्यात आले आहेत.