कोकणामध्ये काही दिवसांपूर्वी पूर आला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी किनारी भागाच्या संरक्षणासाठी समुद्रामध्ये संरक्षक भिंत उभारण्याची घोषणा केली होती. त्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी पूराचे पाणी दुष्काळी भागात फिरवण्याचा उपाय सुचवला आहे. याबद्दल अतुल भातखळकर यांनी ट्वीट केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या संरक्षक भिंत बांधण्याच्या कल्पनेवर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी अतिरिक्त पाणी फिरवण्याच्या विचार व्यक्त केला होता. याबद्दल आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी फडणवीसांचे वक्तव्य योग्य आणि व्यवहार्य असल्याचे म्हटले आहे. ट्वीटमध्ये भातखळकर म्हणतात,
संरक्षक भिंत हा उपाय नाही, पुराचं पाणी दुष्काळी भागात वळवलं पाहिजे असे स्पष्ट व्यावहारिक मत मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. संरक्षक भिंत हा तुघलकी आणि अव्यवहार्य उपाय असून पुराचे पाणी दुष्काळी भागात वळविणे हाच व्यवहारी मार्ग आहे.
संरक्षक भिंत हा उपाय नाही, पुराचं पाणी दुष्काळी भागात वळवलं पाहिजे असे स्पष्ट व्यावहारिक मत मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
संरक्षक भिंत हा तुघलकी आणि अव्यवहार्य उपाय असून पुराचे पाणी दुष्काळी भागात वळविणे हाच व्यवहारी मार्ग आहे. @Dev_Fadnavis pic.twitter.com/ZC8qiUd7I7— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 28, 2021
हे ही वाचा:
… त्या लग्नासाठी उठला लॉकडाऊन?
भास्कर जाधव यांनी पुराचे खापर फोडायला शोधली डोकी
मदत घेऊन निघाले भाजप युवा मोर्चाचे ट्रक…
वर्ल्ड हेरिटेज साईट ठरलेल्या भारतातील मंदिराची काय आहे खासियत?
संरक्षण भिंतीचे विविध दुष्परिणाम स्थानिक पर्यावरणावर होतात. त्यामुळे पुराचं पाणी अडवून दुष्काळी भागात फिरवल्यास त्याचा फायदा दोन्ही भागांना होऊ शकतो. पुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात फिरवल्यानंतर तेथील लोकांना पाणी उपलब्ध होईल, आणि पुरग्रस्त भागातील पुराची समस्या देखील दुर होईल.