भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी(१८ एप्रिल) काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे.राजनाथ सिंह म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे ‘राहुल यान’ लाँचही होत नाही आणि कुठे उरतही नाही.त्यानी दावा केला की, २०१९ मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर राहुल गांधींमध्ये यावेळी तेथून उभे राहण्याची हिंमत नाही.
राजनाथ सिंह पुढे म्हणाले, भाजपा ५ वर्षात गगनयान लाँच करणार आहे, परंतु काँग्रेस पार्टीचा एक युवा नेता आहे, जो २० वर्षांपासून लाँच झाला नाहीये.काँग्रेस पार्टीचा ‘राहुल यान’ लाँचही होत नाही आणि कुठे उरतही नाही.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज केरळच्या पठाणमथिट्टा दौऱ्यावर होते.भाजपचे उमेदवार अनिल के अँटोनी यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.
हे ही वाचा:
लहान मुलांच्या नेस्ले सेरेलॅकवर संशय!
गुगलने २८ कर्मच्याऱ्याना कामावरून कमी केले
‘मुंबई इंडियन्सबरोबरच गुजरात टायटन्सलाही बुडवले’
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात आणखी दोन संशयित अटकेत
दरम्यान, राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.राहुल गांधी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील अमेठी येथील आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले होते की, पक्ष ठरवेल तोच आम्ही निर्णय घेऊ.यावर राजनाथ सिंह म्हणाले की, राहुल गांधी उत्तर प्रदेशातून केरळला निघून गेले आहेत.राहुल गांधी यांना अमेठी लोकसभा मतदारसंघातून निडवणूक लढवण्याची हिम्मत नाहीये. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधींना मागच्या वेळी अमेठी मधून पराभव पत्करावा लागला होता, म्हणून यावेळी त्यांना अमेठी मधून उभे राहण्याची हिम्मत नाहीये.