लोकसभा निवडणुकीपूर्वी झारखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.काँग्रेस खासदार गीता कोडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.गीता कोडा या राज्याचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या पत्नी आहेत.गीता कोडा या सिंहभूम जिल्ह्यातील चाईबासा येथील खासदार आहेत.लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा हा मास्टरस्ट्रोक मनाला जात आहे.प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांच्या उपस्थितीत गीता कोडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात काँग्रेस पक्षाने केलेल्या युतीमुळे त्या खुश न्हवत्या.भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी गीता कोडा यांनी आपला राजीनामा पक्षप्रमुखांकडे पाठवला होता.लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याची भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाचे नुकसान होणार असल्याचे मानले जात आहे.
हे ही वाचा:
शाहजहान शेखला ताबडतोब अटक करा!
मनोज जरांगेंची माघार; आमरण उपोषण घेतले मागे
शर्टावरील अरेबिक शब्द पाहून पाकिस्तानात महिलेवर जमावाचा हल्ला
‘सुशांतसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या विचारात होतो’
तत्पूर्वी, ‘इंडी आघाडी’मधील सदस्यांच्या मतभेदावर प्रकाश टाकत प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी म्हणाले की, ही युती अस्तित्वात आहे का?, भ्रष्ट लोकांचे एकत्रीकरण, असे या युतीचे वर्णन प्रदेशाध्यक्ष मरांडी यांनी केले होते.अलिकडेच पश्चिम बंगालच्या मुखमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेससोबत युती न करण्याचा निर्णय घेतला.याचा संदर्भ देत मरांडी म्हणाले की, इंडी आघाडीची युती अस्तित्वात न्हवती आणि भविष्यातही नसणार आहे, असे मरांडी म्हणाले.ते म्हणाले की, ममता बॅनर्जी म्हणाल्या की पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांना आणि काँग्रेसला एकही सीट देणार नाही.अरविंद केजरीवाल यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करत म्हणाले की, एकही सीट देणार नाही.
आगामी लोकसभा निवडणुकीत झारखंडमधील भाजपच्या कामगिरीबद्दल मरांडी याना विचारण्यात आले.यावर ते म्हणाले की, गेल्या वेळी एनडीए आघाडीने १२ जागा जिंकल्या होत्या आणि दोन जागा गमावल्या होत्या.मात्र, यावेळी आम्ही त्या दोन्ही जागा जिंकू, असा विश्वास मरांडी यांनी व्यक्त केला.दरम्यान, झारखंडचे माजी मुखमंत्री हेमंत सोरेन यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्याबद्दल बोलताना मरांडी म्हणाले की, त्यांच्या कृत्यामुळेच त्यांना अटक झाली आहे.