पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे.दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज छत्तीसगडमधील कांकेर येथे एका जाहीर सभेला संबोधित केले.यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.ते म्हणाले की, देशातील मठ आणि मंदिरांच्या संपत्तीवर काँग्रेसची नजर आहे.तसेच प्रत्येकाच्या मालमत्तेचे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या जाहीरनाम्यात सांगितल्यानंतर काँग्रेसला मिर्ची लागली असल्याचे अमित शहा म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात प्रत्येकाच्या मालमत्तेचे सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. काँग्रेसची देशभरातील मठ, मंदिरे आणि इतर मालमत्तांवर नजर आहे.हा पैसा जाणार कुठे? यासाठी मनमोहन सिंग यांचे विधान आठवा, ते म्हणाले होते की , ‘देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा आहे.मात्र, आम्ही म्हणतो की, पहिला हक्क आदिवासी, दलितांचा आहे.
हे ही वाचा:
देशाच्या कर उत्पन्नात १७.७ टक्क्यांनी वाढ
अमेरिकेचा पाकला झटका, क्षेपणास्त्र निर्मितीसाठी मदत करणाऱ्या कंपन्यांवर बंदी!
बिष्णोई गँगकडून जितेंद्र आव्हाडांना धमकी
बिहारच्या चंपारणमध्ये ‘लव्ह जिहाद’!
ते पुढे म्हणाले, या देशातून पंतप्रधान मोदींनी दहशतवाद संपवला आणि नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर आहे.छत्तीसगडमध्ये ५ वर्षे भूपेश बघेलचे सरकार होते तेव्हा नक्षलवाद्यांवर कोणतीही कारवाई होत न्हवती.तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला आणि विष्णुदेवजींना मुख्यमंत्री केले.यानंतर ४ महिन्यांत ९० हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा केला, १२३ लोकांना अटक झाली, २५० लोकांनी आत्मसमर्पण केले.काँग्रेसच्या ४ पिढ्यांनी देशावर राज्य केले, पण काँग्रेसने छत्तीसगडसाठी काय केले?, असा सवाल देखील अमित शहांनी यावेळी केला.