23 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरराजकारण'राहुल गांधींना राजकीय पटलावरून हटवण्याचे षडयंत्र काँग्रेसमध्येच सुरू!'

‘राहुल गांधींना राजकीय पटलावरून हटवण्याचे षडयंत्र काँग्रेसमध्येच सुरू!’

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला घणाघात

Google News Follow

Related

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ देशभरात कांगावा सुरू झाला आहे. राहुल गांधी यांना कट रचून हटवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. परंतु काँग्रेसचा कोणताही नेता वा प्रियंका गांधी यांनी या सर्व प्रकरणात आतापर्यंत चुप्पी साधलेली दिसून येत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याच मुद्यावरून जोरदार निशाणा साधत राहुल गांधींना राजकीय पटलावरून हटवण्याचे षडयंत्र काँग्रेसमध्येच रचले जात असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.

राहुल गांधींना राजकीय पटलावरून दूर करण्याचा कट रचल्याच्या आरोपांना प्रियंका गांधी किंवा इतर कोणत्याही काँग्रेस नेत्याने उत्तर दिलेले नाही अशी कोपरखळी मारत अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यापासून सुटका करून घेणारे हे कोण आहेत? हा सुनियोजित कट कोणी रचला आहे? कोणी या कटाचे कथानक लिहिले आहे ?असा उलटा सवाल काँग्रेसजनांना केला आहे.

राहुल गांधींना राजकीय पटलावरून हटवण्याचे षडयंत्र काँग्रेसमध्येच रचले जात असल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले, लोक त्यांच्या समर्थनार्थ बाहेर यायला तयार नाहीत. याचा फायदा काँग्रेस कसा घेणार? त्यांना संपूर्ण मागास समाजाचा रोष सहन करावा लागत आहे.

सावरकर? तुम्ही काहीही होऊ शकत नाही

राहुल गांधी यांची तुलना सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करण्याच्या मुद्यावर देखील ठाकूर यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला आहे . ठाकूर म्हणाले, एक अशी व्यक्ती आहे जिने सरकारची प्रमुख व्यक्ती म्हणून गेल्या २२ वर्षात एकही रजा घेतली नाही. आईचे अंतिम संस्कार केल्यानंतर दोन तासांत ते कामावर परतले यावरून त्यांची देशाबद्दलची समर्पणाची भावना दिसून येते आणि तुम्ही त्यांची तुलना राहुल गांधींशी करत आहात. जे म्हणतात की, मी सावरकर नाही,गांधी आहे. तुम्ही काहीही होऊ शकत नाही. तुम्हाला तर दर तीन महिन्यांनी परदेशात सुट्टीवर जायचे असते, अशी जोरदार टीका ठाकूर यांनी केली.

हे ही वाचा:

‘सावरकर गौरव यात्रेला’ जळगावातून सुरुवात

पंतप्रधानांनी पाहिले नवे संसदभवन… भव्य, सुसज्ज आणि नव्या रंगरूपात

संभाजीनगर राड्यातील आरोपींचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले

रामनवमीचा सण देशभरात आनंदाने साजरा

परदेशात नक्राश्रु ढाळतात पण मतदान भारतातील लोक करतात हे विसरतात

गांधी घराणे स्वतःला कायदा, संसद आणि देशापेक्षा वरचढ समजते पण जर्मनी, अमेरिका आणि ब्रिटनसमोर गुडघे टेकते, असा आरोप करून मंत्री ठाकूर म्हणाले, राहुल गांधी परदेशात जाऊन नक्राश्रु ढाळतात पण मतदान भारतातील लोक करतात हे ते विसरले. इथे गुजरातपासून त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा सर्वत्र भाजप जिंकत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा