पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर त्यात काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झालेला पाहायला मिळाला. या पराभवानंतर काँग्रेस पक्षामार्फ़त केंद्रीय कार्यकारिणीची तातडीची बैठकी बोलावण्यात आली. या बैठकीत काँग्रेस पक्ष पराभवाचे आत्मचिंतन करणार असल्याचे म्हटले गेले. तर या पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस पक्षात नेतृत्व बदल होऊ शकतो अशी चर्चा रंगली होती. पण या सर्व चर्चा फोल ठरल्या असून सोनिया गांधी यांनीच काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवावे असा सूर या बैठकीत उमटलेला पाहायला मिळाला.
रविवार, १३ मार्च रोजी काँग्रेसची वर्किंग कमिटी एकत्र भेटली होती. यावेळी त्यांनी पाच राज्यातील पराभवावर चर्चा केली. या बैठकीत पक्षाच्या विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपण आणि आपली मुलं पक्षसाठी काहीही करायला तयार असल्याचे सांगितले. जर पक्षाची कार्यकारणी आणि इतर नेते यांची मागणी असल्यास आपण पायउतार व्हायला तयार असल्याचे सांगितले.
हे ही वाचा:
कॅनडामध्ये अपघातात पाच विद्यार्थ्यांना मृत्यू
त्या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका! चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
जागतिक बाजारात भारतातल्या स्टीलला मोठी मागणी
फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटीस ही आरोपी म्हणून नाही
पण यावेळी पक्षाच्या कार्यकारिणीने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे सांगत त्यांनी पक्षाध्यक्ष पदी कायम राहावे असे म्हटले आहे. सोनिया गांधी यांनी संघटनेतील कमतरता शोधून आवश्यक ते संघटनात्मक बदल करावेत असे म्हटले आहे. तर या पराभवाच्या अनुषंगाने ऑगस्ट महिन्यात काँग्रेस पक्षाचे एक चिंतन शिबीर होणार असल्याचेही समजते. तर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक होणार असल्याची माहिती समोर येत आहे.