गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे वातावरण चांगलाच तापलेले दिसत आहे. यावरून कर्नाटकच्या सीमावर्ती भागात कलाम १४४ लागू करण्यात आले आहे. तर सुरवातीपासूनच या प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फ़ैरी झाडताना दिसत आहेत. पण आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला असून महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणारा समाजकंटक हा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले जात आहे.
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि कर्नाटक विधानसभेतील आमदार सी. टी. रवी यांनी या संदर्भात ट्विट करत काँग्रेस पक्षावर हल्ला चढवला आहे. रवी यांनी आपल्या ट्विटरवर खात्यावरून दोन फोटो अपलोड केले आहेत. या फोटोतील एक इसम हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणारा समाजकंटक असल्याचा दावा केला जात आहे. या फोटोंमध्ये तो कर्नाटकातील काँग्रेस नेते डी.शिवकुमार यांच्या सोबत दिसत आहे. यावरूनच सी. टी. रवी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
I strongly condemn the insult to the great Chhatrapati Shivaji Maharaj by CONgress worker.
It looks like Kotwal's Shishya is behind this shameless act to create communal tensions in Karnataka.
Will @OfficeofUT dare to question Sonia Gandhi for insulting Hindu Hriday Samrat? pic.twitter.com/nRgdBli1NV
— C T Ravi 🇮🇳 ಸಿ ಟಿ ರವಿ (@CTRavi_BJP) December 18, 2021
तर यावरून भाजपाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेलाही लक्ष्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल सोनिया गांधींना जाब विचारणार का? असा सवाल भाजपा कर्नाटकाने उद्धव ठाकरेंना विवचारला आहे. तर भाजपा महाराष्ट्र्रानेही अधिकृत ट्विटर खात्यावरून शिवसेनेला लक्ष्य केले आहे. “शिवरायांच्या सिंहासनापेक्षा लाचारीने मिळविलेल्या सत्तेची खुर्ची शिवसेनेला अधिक प्रिय वाटत आहे. हा शिवसेनेच्या लाचारीचा सर्वोच्च बिंदू आहे!” असा घणाघात भाजपा महाराष्ट्राने केला आहे.
आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात @INCIndia चा हात असेल आणि शिवसेना त्याला मूक संमती देत असेल, तर शिवरायांच्या सिंहासनापेक्षा लाचारीने मिळविलेल्या सत्तेची खुर्ची शिवसेनेला अधिक प्रिय वाटत आहे. हा @ShivSena च्या लाचारीचा सर्वोच्च बिंदू आहे! https://t.co/qmmmRxDT1T
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 18, 2021