पंतप्रधान मोदी यांनी संसदेत काँग्रेसवर घाणाघाती टीका केली होती. यावरून महाराष्ट्रातही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. चंद्रपूरमध्येही भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. तेथे एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला उठाबशा करायला लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे भाजप कार्यकर्ते संतापले होते.
राकेश कुर्झेकर असे या काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याने नरेंद्र मोदी यांच्याबद्दल फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. ही आक्षेपार्ह पोस्ट पाहून भाजपचे कार्यकर्ते संतापले. त्यानंतर फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर राकेशला ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. त्याठिकाणी भाजपचे कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्याला चांगलेच झापले आणि माफी मागायला लावली. उठाबशा काढायला लावल्या. राकेश कुर्झेकर यांनी माफी मागितली असून उठाबशाही काढल्या. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी त्याच्या विरोधात तक्रार दिली नाही.
हे ही वाचा:
‘काँग्रेसची हुजुरी करण्यासाठी संजय राऊत वाटेल ते बोलू शकतात’
पत्रकार राणा अय्यूब यांची १.७७ कोटी रक्कम ईडीने गोठवली
डॉक्टर घेणार हिप्पोक्रॅटिक ओथ ऐवजी चरक शपथ?
लता दीदींच्या स्मारकावरून राजकारण नको, मंगेशकर कुटुंबियांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना काँग्रेसवर निशाणा साधला होता. काँग्रेस नसती तर काय झाले असते याचा पाढा नरेंद्र मोदींनी वाचून दाखवला होता. लोकशाही परिवारवादापासून मुक्त झाली असती, भारत विदेशी चष्म्यातून बघण्यापेक्षा स्वदेशीच्या मार्गाने चालला असता. आणीबाणी लादली गेली नसती. अनेक दशके भ्रष्टाचार झाला नसता, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली होती.