राहुल गांधींनी आपला पराजय पाहिला आहे, देशात त्यांना ४० जागाही मिळणार नाहीत!

पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर टीका

राहुल गांधींनी आपला पराजय पाहिला आहे, देशात त्यांना ४० जागाही मिळणार नाहीत!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (१४ मे) वाराणसी मधून लोकसभेचा अर्ज दाखल केला.उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी वाराणसी येथे इंडिया टुडेला मुलाखत दिली.या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.काँग्रेसला उत्तर प्रदेशात एकही जागा मिळणार नसून देशात ४० च्या पुढे जाणार नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही ४०० पार करण्याचे लक्ष ठेवून पुढे चालत आहोत आणि तसे देशानेच आम्हाला सांगितले.उत्तर प्रदेशाने आम्हाला भरपूर आशीर्वाद दिला आहे.मी तुम्हाला सांगतो लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही.रायबरेली मधून राहुल गांधी उभे राहिले आहेत.यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, ते तर मोडियासाठी खूप महत्वपूर्ण आहेत आणि मीडियाची माणसे त्यांच्या परिवाराची परिपूर्ण काळजी घेत आहेत, कदाचित त्यांची काही मजबुरी असेल, मला यावर काही बोलायचे नाही.ते पुढे म्हणाले, मी तर जमिनीवरचा माणूस आहे, गरीब आईचा मुलगा आहे.

राहुल गांधी यांच्यावर टीका करत पंतप्रधान मोदी म्हणाले, राहुल गांधींनी आपला पराजय बघितला आहे, वायनाडमधून ते पळून गेले आहेत.वायनाडमधून पळून ते रायबरेलीला जात असताना या कालावधीत त्यांनी आपली भाषा बदलली आहे, अधिक तिखट, काही वाटेल ते बोलत आहेत.केरळने त्यांना धडा शिकवला आहे, कदाचित केरळच्या लोकांनी त्यांना ओळखले असेल.

हे ही वाचा:

सलमान खान गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणामधून ठोकल्या बेड्या

श्रीनगरमध्ये ऐतिहासिक ३८ टक्के मतदान!

रास्व संघाचा नेता रुद्रेशची हत्या केल्यानंतर पीएफआयकडून हिंदूंना मारण्यासाठी ‘डेथ स्क्वॉड’ची उभारणी!

भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने मागवले अर्ज!

ते पुढे म्हणाले, उत्तर प्रदेशातील जनता परिवारवादाला स्वीकारू शकत नाही.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याने विकास पाहिला आहे.योगीजींचे काम जनतेने पाहिले आहे.

ते पुढे म्हणाले, माझ्या आईने मला एकदा काशीमधील घडामोडींबद्दल विचारले होते, ज्यावर मी तिला सांगितले होते की, राज्यात समाजवादी पक्षाचे सरकार असल्यामुळे मी काहीही करू शकलो नाही. पण मी तिला सांगितले की, भाजप जिंकल्यानंतर मी राज्यासाठी काम करेन.पंतप्रधान मोदींनी यावेळी सर्व राज्यातील भाजप नेत्यांचे, मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.ते म्हणाले, मला सौभाग्याने अतिशय एक चांगली टीम मिळाली आहे.प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री हे सर्व तत्त्वे आणि विचारधारेवर काम करत आहेत.त्यामुळे मला यांचा गर्व आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Exit mobile version