काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार

काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार

काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढत असून दिवसेंदिवस काँग्रेसचे नेते राजीनामा देत आहेत. आता काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे तर १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे काँग्रेसला अध्यक्ष मिळणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. २४ सप्टेंबरपासून नामांकन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होईल तर १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभं राहण्यास नकार दिला आहे. तसेच गांधी कुटुंबाशिवाय इतर अध्यक्ष करण्यास राहुल गांधी यांनी संमती दाखवल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे काँग्रेसला बऱ्याच वर्षानंतर गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे.

हे ही वाचा:

‘स्वातंत्र्यदिनानिमित्त सामुहिक शक्तीचे घडले दर्शन’

गृहमंत्री अमित शहा मुंबईत ‘या’ गणेशोत्सवाला भेट देणार

Twin Tower Demolition: काही सेकंदात कोसळले भ्रष्टाचाराचे टॉवर

…. पण नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका!

काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची आज एक बैठक झाली. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. आझाद यांनी पक्ष नेतृत्वार टीका करतच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. तर आज काँग्रेस नेते एम. ए. खान यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका करत राजीनामा दिला आहे.

Exit mobile version