28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणकाँग्रेस देशभरात ३००हून कमी जागा लढवणार

काँग्रेस देशभरात ३००हून कमी जागा लढवणार

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची सर्वांत कमी संख्या

Google News Follow

Related

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सर्वांत कमी जागांवर लढत देणार आहे. ‘इंडिया’सोबतच्या निवडणूकपूर्व वाटाघाटीमुळे आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष असणाऱ्या काँग्रेसवर ही वेळ आली आहे.
काँग्रेसने आतापर्यंत २७ राज्ये आणि सर्व आठ केंद्रशासित प्रदेशांमधील २७८ उमेदवारांची घोषणा केली आहे.

पक्षाकडून बिहार, पंजाब, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेलीतील दोन जागा व प. बंगालमधील काही जागांची घोषणा होणे बाकी आहे. मात्र या सर्व जागा अवघ्या २० आहेत. त्यामुळे या सर्व जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले तरी ही संख्या २९८वर पोहोचते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या लोकसभा निवडणुकांमधील काँग्रेसची ही सर्वांत कमी संख्या आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी सन २०१९मध्ये ४२१, सन २०१४मध्ये ४६४, सन २००९मध्ये ४४० आणि सन २००४मध्ये ४१७ जागांवर उमेदवार उभे केले होते. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने सन २०१९मध्ये ५२, सन २०१४मध्ये ४४, सन २००९मध्ये २०६ आणि सन २००४मध्ये १४५ जागांवर विजय मिळवला होता.

सन १९८९ ते १९९९ दरम्यान जेव्हा आघाडीचे राजकारण भारतीय निवडणुकांचा अविभाज्य भाग झाला. तेव्हादेखील काँग्रेस पक्ष सुमारे ४५० जागांवर उमेदवार उभे करत होता. सन १९९९मध्ये काँग्रेसने ४५३, १९९८मध्ये ४७७, १९९६मध्ये ५२९, १९९१मध्ये ४८७ जागांवर तर, १९८९मध्ये ५१० जागांवर उमेदवार उभे केले होते. उमेदवारांच्या कमी लोकसंख्येबाबत काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याला विचारणा करण्यात आली. तेव्हा ‘आम्ही यंदा अधिक जागांवर लढत देणार नाही. मात्र २७२पेक्षा अधिक जागा नक्कीच जिंकू,’ असे त्याने सांगितले. लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी किमान २७२ धावा आवश्यक असतात.

काँग्रेसने उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि तमिळनाडू ही चार राज्ये मिळून २०१ जागा असणाऱ्या राज्यांत मोठ्या संख्येने जागा मिळवल्या आहेत. यापैकी काँग्रेस उत्तर प्रदेशातील अमेठी, रायबरेलीसह १७, बिहारमध्ये नऊ, तमिळनाडूतील नऊ आणि आतापर्यंत तरी बंगालमधील १३ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.

हे ही वाचा:

“पत्राचाळीचे आरोपीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहायला लागले आहेत”

राजस्थान: ट्रकच्या धडकेने कारला आग, सात जणांचा होरपळून मृत्यू!

तीन षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने चाहत्याला दिली खास भेट

इस्रायल-इराण संघर्षाबद्दल भारताने व्यक्त केली तीव्र चिंता!

उत्तर प्रदेशपाठोपाठ सर्वांत जास्त जागा असणाऱ्या महाराष्ट्रातही काँग्रेस पक्ष सर्वांत कमी जागा लढवणार आहे. येथील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी काँग्रेस १७ जागा लढवणार असून शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार) १० जागा लढवणार आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाने २५ आणि २६ जागा लढवल्या होत्या.

काँग्रेसने दिल्ली, गुजरात आणि पंजाबमध्येही आम आदमी पक्षाशी आघाडी केली आहे. या तिन्ही राज्यांत काँग्रेस सहा जागा लढवणार आहे. ‘तुम्ही ‘इंडिया’ची तुलना यूपीएशी करू शकत नाहीत. यूपीए ही निवडणुकीनंतर (सन २००४) केलेली व्यवस्था होती. तर, ‘इंडिया’ ही निवडणूकपूर्व आघाडी आहे. आम्हाला ज्या जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे आम्ही असमाधानी नाही. आघाडीमध्ये मोठ्या पक्षांना छोट्या पक्षांसाठी जागा करून द्यावी लागते,’ असे काँग्रेस पक्षातील एका नेत्याने सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा