भिवंडी आमचीच, काँग्रेसने राष्ट्रवादीला बजावले!

काँग्रेसचे प्रदेश महासचिव राजेश शर्मांनी स्पष्ट केली भूमिका

भिवंडी आमचीच, काँग्रेसने राष्ट्रवादीला बजावले!

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) उमेदवार निवडणूक लढेल अशी चर्चा असताना काँग्रेसने त्या चर्चेवर नाराजी व्यक्त करत या मतदारसंघावर काँग्रेसचाच हक्क असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. काँग्रेसचे प्रदेश महासचिव राजेश शर्मा यांनी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादीवर निशाणा साधला आणि काँग्रेसची भिवंडीबाबतची नेमकी भूमिका स्पष्ट केली.

पत्रकारांनी भिवंडीबाबत राष्ट्रवादी इच्छुक असल्याचे सांगितल्यानंतर शर्मा म्हणाले की, भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच उमेदवार देणार आणि आम्हीच विजयी होणार.  राहुल गांधी ठरवणार तोच उमेदवार. राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव ठाकरे हे आमचे सहकारी पक्ष आहेत. पण हा विषय  आला त्याचे मला दुःख झाले. कारण यासंदर्भात आमची चर्चा झालेली आहे.

शर्मा म्हणाले की, महाविकास आघाडीच्या चर्चेत हे स्पष्ट झालेले आहे की, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनीही भिवंडीची जागा काँग्रेसला दिलेली आहे. त्यामुळे भिवंडी काँग्रेसच लढणार. राष्ट्रवादीने भिवंडीवर आपला दावा केलेलाच नाही. आमची चर्चा झाली त्यात भिवंडी काँग्रेसला दिलेला आहे. उलट काँग्रेसच कशी जिंकेल यासाठी मदत करण्याची तयारीही इतर दोन सहकारी पक्षांनी दाखविलेली आहे. त्यामुळे तिथे काँग्रेसशिवाय बाकी कुणी जागा लढवेल हा प्रश्नच येत नाही.

हे ही वाचा:

समुद्रीचाच्यांना रोखण्यासाठी अदनच्या खाडीत आयएनएस कोच्ची, कोलकाता तैनात

‘फुटीरतावाद्यांविरोधात कॅनडा कारवाई करेल, ही आशा’

मराठा आरक्षण सरसकट नाही, पण २४ डिसेंबरचा अल्टिमेटम नको

तोंड काळे करण्याचा शौक…

भिवंडीच्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार लढणार. कोणताही आयात उमेदवार घेऊन तो लढणार नाही. राहुल गांधी, नाना पटोले ठरवतील तोच उमेदवार लढणार, असेही शर्मा म्हणाले.

Exit mobile version