डायनासोरसारखी नामशेष होईल ‘काँग्रेस’

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा हल्ला

डायनासोरसारखी नामशेष होईल ‘काँग्रेस’

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा निवडणूक प्रचार जोरात सुरु आहे.उत्तराखंडमधील पौरी गढवाल येथे एका सभेला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.ते म्हणाले की, डायनासोर प्रमाणे काँग्रेस पक्षही काही वर्षात नामशेष होईल.राजनाथ सिंह यांनी काँग्रेसच्या अंतर्गत भांडणाची तुलना टेलिव्हिजन शो ‘बिग बॉस’शी करत म्हटले की, पक्षाचे नेते रोज एकमेकांचे कपडे फाडत आहेत.

राजनाथ सिंह म्हणाले की, काँग्रेसमधून नेत्यांची पळापळ सुरूच आहे.एकापाठोपाठ एक पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.मला अशी भीती वाटते की, काही वर्षात काँग्रेस डायनासोरप्रमाणे नामशेष होईल.काँग्रेसवर जोरदार टीका करताना संरक्षण मंत्री म्हणाले की, स्वतंत्र भारतातील पहिला जीप घोटाळा काँग्रेसच्या काळात झाला.काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचारामुळे मंत्र्यांनाही तुरुंगात जावे लागले.

हे ही वाचा:

वानखेडेवर कोहलीचे ‘विराट’ मन

शाब्बास डीके! रोहीतची कार्तिकला कौतुकाची थाप…

विशाल पाटलांना उमेदवारी नाकारल्यामुळे मिरज काँग्रेसमध्ये उठाव

बघू आता तुम्हाला ‘राम’ वाचवतो की ‘हिंदू धर्म’!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे संरक्षण मंत्री सिंह यांनी कौतुक केले.ते म्हणाले की, २०१९ पर्यंत उत्तराखंडमधील १०० पैकी फक्त ९ कुटुंबांच्या घरात पाईपने पाणी येत होते.आज उत्तराखंडमधील १०० पैकी ९० कुटुंबांच्या घरात नळ आहेत.मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकारला १० वर्षे झाली असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

 

Exit mobile version