उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी (४ एप्रिल) काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली. तसेच काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही निशाणा साधला.मुख्यमंत्री योगी म्हणाले की, या काँग्रेसला औरंगजेबाचा जिझिया कर जबरदस्तीने लागू करायचा आहे, जो कोणीही भारतीय मान्य करणार नाही.भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या प्रचारासाठी गुना लोकसभा मतदारसंघातील अशोक नगर शहरातील रॅलीला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी बोलत होते.
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, औरंगजेब क्रूर होता.कोणीही आपल्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवत नाही.औरंगजेबाने जिझिया कर लागू केला होता आणि काँग्रेस देखील याच जिझिया कराबाबत बोलत आहे.काँग्रेस जो वारसा कर म्हणत आहे तो हाच आहे.राहुल गांधी म्हणाले की आम्ही सर्वे करणार आहोत.योगी पुढे म्हणाले, ही लोकं सर्वे करून तुमची आर्धी संपत्ती घेतील आणि स्वतःची आहे असे म्हणतील.काँग्रेसला जिझिया कर लागू करायचा आहे.कोणी याचा स्वीकार करेल का?, असा सवाल मुख्यमंत्री योगींनी केला.
हे ही वाचा:
दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या अरविंदर सिंग लवली यांच्या हाती ‘कमळ’
वडेट्टीवारांची कसाबला क्लीनचीट, निकम मात्र देशद्रोही
पाकिस्तानी मच्छिमारांसाठी भारतीय नौदल बनले देवदूत!
बंगालच्या राज्यपालांवर विनयभंगाचा आरोप, पोलिसांकडून तपास सुरु!
आजचा हा नवा भारत आहे.देशातील सीमा सुरक्षित झाल्या आहेत. देशातून दहशतवाद आणि नक्षलवादावर नियंत्रण आले आहे.पंतप्रधान मोदींच्या कामाचा त्यांनी उल्लेख करत त्यांनी प्रशंसा केली.प्रभू राम मंदिराच्या स्थापनेचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सिंधिया कुटुंबाच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक लढ्याचेही कौतुक केले आणि राजमाता यांच्या योगदानाचे स्मरण केले.गुना मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार असून भाजपचे उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.