महाराष्ट्रात सध्या राज्यसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. पण ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेचे नेते प्रयत्नशील दिसत आहेत. काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
गुरुवार, २३ सप्टेंबर रोजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी फडणवीस यांना भेटून काँग्रेस नेत्यांनी राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनंती केली आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लक्षात घेता ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी काँग्रेसची भूमिका आहे.
हे ही वाचा:
‘ही’ असेल भारताची पहिली इलेक्ट्रिक सुपरकार
किरीट सोमय्या यांचे मूल्य ५५० कोटी रुपये
बिजिंगपर्यंत मारा करणाऱ्या अग्नी-५ ची आज चाचणी
नवज्योत सिद्धू मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी कोणतेही बलिदान द्यायला मी तयार
देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि भाजप कोअर कमिटीशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपाने या निवडणुकीसाठी मुंबईत महामंत्री संजय उपाध्याय यांना रिंगणात उतरवले आहे. तर काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.