भारताने इस्रायलविरोधी भूमिका घ्यावी-काँग्रेस

भारताने इस्रायलविरोधी भूमिका घ्यावी-काँग्रेस

इस्रायली सैन्याने दगडफेक करणाऱ्या पॅलेस्टिनींना मशिदीत जाऊन पकडल्यामुळे पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये नाराजी आहे. मुसलमानांसाठी तिसरी सगळ्यात पवित्र मशीद असलेल्या अल अक्सा मशिदीत घुसून दगडफेक करणाऱ्यांना इस्रायली पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे भारतातही अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष नसीम खान यांनी, भारताने इस्रायलच्या या कृतीची निंदा करावी अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे.

नसीम खान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे हे निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार उबेदुल्लाह खान आजमी, रजा अकादमीचे प्रमुख सईद नूरी, माजी आमदार युसूफ अब्राहानी उपस्थित होते.

इस्रायल आणि पॅलेस्टाईनची अतिरेकी संघटना हमास यांच्यातील संघर्ष काही नवा नाही, परंतु हा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय. पॅलेस्टाईन आणि इस्रायली सुरक्षा दलांमध्ये गेल्या आठवड्यात शुक्रवारी रात्री जेरूसलेमच्या अल अक्सा मशिदीत हिंसक चकमक झाली. आता इस्रायल आणि हमास यांच्यातील चकमकीचं परिवर्तन हवाई आणि रॉकेट हल्ल्यांमध्ये झालंय. या हवाई हल्ल्यात दोन्ही बाजूंनी बरेच लोक ठार झाल्याचे वृत्त आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्र मॉडेल अनुसरा, पीआर आणि सोशल मीडियासाठी पैसे उधळा

इस्राएलविरुद्ध इस्लामिक राष्ट्र आक्रमक, ‘ही’ कारवाई करणार

पंतप्रधान जिल्हाधिकाऱ्यांना देणार कानमंत्र

मुंबई महानगरपालिकेकडून लसींसाठी ग्लोबल टेंडर

सोमवारी हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलच्या दिशेने १०० क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्याला इस्रायलकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. हमासनं इस्त्राईलवर केलेल्या हल्ल्यामध्ये भारतातील  सौम्या संतोष या महिलेला जीव गमवावा लागला आहे. हमासनं डागलेलं क्षेपणास्त्र सौम्या संतोष ज्या घरात होती त्यावर घरावर कोसळलं यामध्ये तिचा मृत्यू झाला. सौम्या संतोष ही केरळमधी इडुक्की मधील होती. इस्त्राईलमध्ये गेल्या सात वर्षांपासून केअर टेकर म्हणून ती काम करत होती.

Exit mobile version