29 C
Mumbai
Friday, April 25, 2025
घरराजकारण... तर मुस्लिम तरुणांना पंक्चर दुरुस्तीचे काम करावे लागले नसते

… तर मुस्लिम तरुणांना पंक्चर दुरुस्तीचे काम करावे लागले नसते

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर साधला निशाणा

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हरियाणामध्ये विकासकामांची पायाभरणी करत एका विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान केला आणि त्यांनी दलितांना व्होट बँक बनवले. काँग्रेसने व्होट बँकेचा विषाणू पसरवला, अशी घाणाघाती टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली. तसेच नरेंद्र मोदींनी वक्फ कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेसलाही सुनावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर वक्फ कायद्याला विरोध करण्यावरूनही जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने राजकीय फायदा घेण्यासाठी वक्फ कायद्यात मनमानी बदल केले. जर तुम्हाला मुस्लिमांची काळजी असेल तर काँग्रेस मुस्लिमांना आपला पक्षाध्यक्ष का बनवत नाही? लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांना ५० टक्के तिकिटे द्या. पंतप्रधान असेही म्हणाले की, लाखो हेक्टर जमीन ही वक्फची मालमत्ता आहे. जर वक्फच्या मालमत्तेचा प्रामाणिकपणे वापर केला असता, तर मुस्लिम तरुणांना सायकलच्या पंक्चर दुरुस्त करून उदरनिर्वाह करण्याची गरज पडली नसती. परंतु या मालमत्तेचा फायदा काही भूमाफियांनाच झाला. हे माफिया दलित, मागासवर्गीय आणि विधवांच्या जमिनी लुटत होते. वक्फ कायद्यातील या बदलांनंतर गरिबांची लूट थांबेल. नवीन वक्फ कायद्यानुसार, आदिवासींच्या जमिनी किंवा मालमत्तेला वक्फ बोर्ड हात लावू शकत नाही. गरीब मुस्लिमांना त्यांचे हक्क मिळतील. हा खरा सामाजिक न्याय आहे, असे म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, “काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत काय केले ते कधीही न विसरता येण्यासारखे आहे. जोपर्यंत डॉ. बाबासाहेब जिवंत होते, तोपर्यंत काँग्रेसने त्यांचा अपमान केला. त्यांना दोनदा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. काँग्रेस सरकार त्यांना काढून टाकण्यात व्यस्त होते. त्यांना व्यवस्थेबाहेर ठेवण्यात आले. जेव्हा ते आपल्यात नव्हते, तेव्हा काँग्रेसने त्यांची आठवण पुसून टाकण्याचा प्रयत्नही केला. काँग्रेसला बाबा साहेबांचे विचारही कायमचे नष्ट करायचे होते. काँग्रेस संविधानाचा विध्वंसक बनली आहे. सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी संविधानाला एक शस्त्र बनवले आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेसवर सत्तेचे संकट आले तेव्हा त्यांनी संविधान चिरडले. संविधानाचा आत्मा असा आहे की सर्वांसाठी एकसमान नागरी संहिता असावी, ज्याला मी समान नागरी संहिता म्हणतो, परंतु काँग्रेसने तो लागू केला नाही. उत्तराखंडमध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर समान नागरी कायदा लागू करण्यात आला. देशाचे दुर्दैव म्हणजे ज्यांच्या खिशात संविधान आहे, तेच काँग्रेसचे लोक त्याचा विरोध करत आहेत,” अशी सडकून टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे.

हे ही वाचा  : 

पवन कल्याण यांच्या पत्नीने तिरुमला मंदिरात केले केस दान; काय आहे कारण?

म्यानमार: ‘ऑपरेशन ब्रह्मा’मध्ये सहभागी असलेल्या हवाई दलाच्या विमानावर जीपीएस स्पूफिंग हल्ला

गुजरातजवळील अरबी समुद्रातून १,८०० कोटींचे ३०० किलो ड्रग्ज जप्त

…तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचा पर्याय

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, डॉ. आंबेडकर हे समानता आणू इच्छित होते, परंतु काँग्रेसने व्होटबँकचा व्हायरस पसरवला. काँग्रेस सरकारच्या काळात एससी, एसटी ओबीसींसाठी बँकेचे दरवाजे उघडे नव्हते. कर्ज, कल्याण सर्वकाही फक्त एक स्वप्न होते, परंतु आता जनधन खात्यांचे सर्वात मोठे लाभार्थी एससी, एसटी बंधू आणि बहिणी आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
244,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा