देशातील लोकसभेच्या निवडणुकांची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश राज्याची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशातच या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाकडून महत्वाचाही घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या मार्फत ही घोषणा केली गेली आहे.
आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फ़े ४० टक्के महिला उमेदवार देण्यात येणार आहेत. ‘लडकी हूं, लड सकती हूं’ अशा प्रकारचा नारा प्रियांका गांधी यांनी दिला आहे. यामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची प्रचाराची रणनीती आणि प्रचारातील महत्वाचे मुद्दे हे महिला प्रश्नाशी संबंधित असणार असल्याचे म्हटले जात आहे.
मंगळवार, १९ ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे प्रियांका गांधी यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे. या वेळी प्रियांका गांधी यांनी महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात राजकारणात आलं पाहिजे असे म्हटले आहे. महिला समाजसेविका, शिक्षिका, पत्रकार अथवा इतर क्षेत्रांशी संबंधित असलेल्या महिलांनी स्वारस्य असेल तर राजकारणात जरूर यावे असे प्रियांका यांनी म्हटले आहे. तर त्यांना ज्या विधानसभा क्षेत्रात स्वारस्य असेल तिथून त्यांनी अर्ज करावा. आम्ही त्यांना तिकीट देऊ असे देखील प्रियांकांनी सांगितले आहे. तर काँग्रेसने सुरुवातीला महिलांना ४० टक्के तिकिटे देण्याचे आश्वासन दिले असले तरी लवकरच आगामी काळात हा आकडा ५० टक्क्यांवर नेला जाईल असे प्रियांका यांनी सांगितले.
हे ही वाचा:
‘बांगलादेशी हिंदूंचे रक्षण आणि पुनर्वसन करा!’ काँग्रेस नेत्याची मागणी
मद्यपी तरुणाला सोडवण्यासाठी काँग्रेस आमदाराचे आंदोलन
आर्यन खानच्या सुटकेसाठी शिवसेना नेत्याची धडपड!
रशिया आणि ‘नाटो’ मध्ये का रे दुरावा?
२०१४ आणि २०१९ लोकसभा निवडणूकीत महिला मतदार मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी यांच्या मागे उभ्या राहिलेल्या दिसून आल्या होत्या. या मतदाराने भाजपाच्या आजवरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसून आले आह. म्हणूनच काँग्रेस आता या मतदारावर डोळा ठेवून असल्याचे म्हटले जात आहे. त्यादृष्टीनेच ही ४० टक्के तिकिटे महिलांना देण्याची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.