मराठा आरक्षणावरून अजूनही वाद सुरु आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील करत आहेत. यावरून ओबीसी समाजाकडून प्रचंड विरोधी होत आहे. याच दरम्यान, आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मराठा आणि ओबीसी समाजाबाबत विशेष रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या या विशेष रणनीतीवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. मराठा-ओबीसी समाजाबाबत काँग्रेसची विशेष रणनीती म्हणजे, ‘विष कालवा, फुट पाडा अन मते मिळवा’ ही आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
हरियाणाच्या नुकत्याच निवडणूका पार पडल्या आणि निकालही जाहीर झाला. निवडणुकीच्या निकालापूर्वी काँग्रेसने असे घोषित केले की, भाजप राज्यातून हद्दपार होणार आणि काँग्रेसचे सरकार येणार. मात्र, निकालादिवशी सर्व चित्र बदलले आणि काँग्रेस तोंडघशी पडली. भाजपने बहुमताचा आकडा पार करत राज्यात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला. हरियाणाच्या निवडणुकीत पराभव मिळाल्यानंतर काँग्रेसने आता महाराष्ट्राकडे नजर वळविली आहे.
हे ही वाचा :
‘पंतप्रधान मोदी आले असते तर बरे झाले असते, आज आम्ही सर्वांकडून भीक मागत आहोत’
विधानसभेचे बिगुल वाजले; २० नोव्हेंबरला मतदान तर २३ रोजी लागणार निकाल
‘सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी कुदळ मारून, नारळ वाढवून केले भूमिपूजन’
मतदानात सहभागी होऊन लोक ईव्हीएमबाबतच्या शंकांचे उत्तर देतात!
राज्यात मराठा-ओबीसीच्या आरक्षणावरून सुरु असलेल्या वादावरून काँग्रेस नवी योजना आखण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मराठा-ओबीसी समाजाबाबत विशेष रणनीती आखण्याच्या तयारीत काँग्रेस आहे. जेणेकरून विधानसभा निवडणुकीत पक्षाला मत मिळतील. निवडणुकीच्या पार्शभूमीवर काँग्रेसची आज (१५ ऑक्टोबर) महत्वाची बैठक देखील पार पडल्याची माहिती आहे. दरम्यान, यावरून भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्वीटकरत लिहिले, मराठा आणि ओबीसी समाजाबाबत काँग्रेसची विशेष रणनीती म्हणजे… हिंदू समाजातील या दोन्ही घटकांमध्ये विष कालवायचे… त्यांच्यात फूट पडायची… आणि दोघांची मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा. हिंदू समाजाच्या जातीपातींमध्ये विष कालवूनच काँग्रेसने आजपर्यंत सत्ता मिळवली आहे. मात्र महाराष्ट्राचा सुजाण मतदार काँग्रेसचीही कुटील नीती यशस्वी होऊ देणार नाही एवढे नक्की, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मतदान २० नोव्हेंबर होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. तसेच एका टप्प्यात मतदान पार पडणार आहे.
मराठा आणि ओबीसी समाजाबाबत काँग्रेसची विशेष रणनीती म्हणजे…
हिंदू समाजातील या दोन्ही घटकांमध्ये विष कालवायचे… त्यांच्यात फूट पडायची… आणि दोघांची मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा.
हिंदू समाजाच्या जातीपातींमध्ये विष कालवूनच काँग्रेसने आजपर्यंत सत्ता मिळवली आहे. मात्र… pic.twitter.com/fKiLkeQkTO— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 15, 2024