नागपूरमध्ये विधान परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली की, आमचा उमेदवार गरीब होता आणि भाजपाचा उमेदवार आर्थिकदृष्ट्या बलाढ्य होता. भाजपाने या निवडणुकीत घोडेबाजार केला.
नागपूर विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला. त्यात बावनकुळे यांनी काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या मंगेश देशममुख यांचा पराभव झाला आहे. बावनकुळे यांनी ३६२ मते मिळविली तर काँग्रेस समर्थन असलेल्या उमेदवाराला १८६ मते पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये थेट सामना होता.
पटोले म्हणाले की, “काँग्रेसच्या मतांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. आमचा उमेदवार गरीब होता, पण भाजपाचा उमेदवार आर्थिकदृष्ट्या बलाढ्य होता. भाजपाकडे ९० मते जास्त होती. तरीही त्यांना धावपळ करावी लागली. त्यांचा घोडेबाजार करावा लागला. हाच खऱ्या अर्थाने भाजपाचा नैतिक पराभव आहे. आजच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो.
भाजपामधून काँग्रेसमध्ये आलेल्या छोटू भोयर यांच्याबद्दल ते म्हणाले की, भाजपाचा एक माणूस आमच्याडे आला आल्यामुळे आमचा पक्ष पुन्हा मजबूत झाला आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव नक्की आहे.
छोटू भोयर यांना या निवडणुकीत अवघे एकच मत पडले. हे मत त्यांचेच असल्याचे बोलले गेले असले तरी हे मत कुणी दिले याचा शोध घेऊ असे भोयर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
हे ही वाचा:
हेल्मेट घाला, वाहन हळू चालवा नाहीतर…
चीनच्या ‘आक्रमक कृती’विरुद्ध अमेरिकेचे महत्वाचे वक्तव्य
राहुल गांधींची शिवाजी पार्कवरची सभा रद्द
याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, भाजपानं आपली मतं एकत्र ठेवली म्हणजे तो घोडेबाजार झाला का? घोडेबाजार तर दोन रात्रींमध्ये झाला, जेव्हा दोन्ही मंत्री ते करत होते आणि हे संपूर्ण नागपूरनं पाहिलं आहे. पक्ष म्हणजे आपणच, दुसरं कुणी नाही ही त्यांची भूमिका होती. म्हणून मतदारांनी त्यांना जागा दाखवली आहे.