लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी अर्जही भरला आहे. अर्ज भरण्यापूर्वी त्यांची प्रचारसभा चंद्रपूरमध्ये पार पडली. यावेळी झालेल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, “देशाचा नेता कोण असेल? नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं हे ठरवणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक हे ठरवणार आहे की देशात मोदींचं राज्य आणायचं की राहुल गांधींना संधी द्यायची. सुधीर मुनगंटीवार यांना दिलेलं मत मोदींना दिलेलं मत आहे. तर काँग्रेसला दिलेलं प्रत्येक मत राहुल गांधींना दिलेलं मत आहे हा विचार करुन मत द्या,” असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात, नितीन गडकरींच्या पुढाकाराने विदर्भाचा चेहराही बदलला आहे. चंद्रपूरच्या जनतेने निर्धार केला आहे की यावेळची जागा रेकॉर्ड मतांनी आपल्याला निवडून आणायची आहे. महायुतीचा फॉर्म भरायची सुरुवात कुठून करायची तर ती चंद्रपूरपासून झाली पाहिजे असा ठराव आम्ही केला, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
“कुंभकर्ण म्हणेल, मी सहा महिने झोपायचो काँग्रेसवाले वर्षभर झोपतात”
अमेरिकेत जहाज धडकून ब्रिज कोसळला
‘जय श्री राम’ बोलला म्हणून मीरा रोडमध्ये अल्पवयीन मुलाला केली मारहाण
पंजाबमध्ये अकाली नको; भाजपा ‘अकेला’ करणार वाटचाल
“काँग्रेस नेते राहुल गांधीनी जिथे यात्रा काढली तिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला किंवा काँग्रेस पक्ष फुटला. देशाच्या कानाकोपऱ्यात एकच नाव ऐकू येतं ते म्हणजे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हे असं नेतृत्व आहेत ज्यांनी गरीबांना घर दिलं, गरीब कल्याणाचा अजेंडा आणला. जगाच्या इतिहासात जे झालं नाही ते मोदींनी करुन दाखवलं. २५ कोटी गरीबांना दारिद्र्य रेषेबाहेर काढलं. आम्ही सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्राला हिरवगार करण्याचं स्वप्न ५० कोटी वृक्ष लावून सुधीर मुनगंटीवार यांनी पूर्ण करुन दाखवलं. सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाच्या निमित्ताने त्यांची वाघनखं ब्रिटिशांनी नेली. ती वाघनखं दर्शनासाठी आणण्याचं काम सुधीर मुनगंटीवार यांनी केलं,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.