हिमाचल प्रदेशमधील राजकारणात अस्थिरता आली असून सत्ताधारी कॉंग्रेस पक्षात फूट पडल्याचे आहे. हिमाचल प्रदेश काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. अशातच काँग्रेस नेते आणि मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेस हायकमांडला फोन करत सतर्क केलं आहे. मुख्यमंत्री बदलला नाही तर राज्यातील सरकार जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्याबद्दलची नाराजी त्यांनी वरिष्ठांना बोलून दाखवली आहे. मुख्यमंत्री पदी नवा चेहरा देण्याची अनेक आमदारांची मागणी आहे. त्यामुळे त्याचा विचार करावा, असं आवाहन विक्रमादित्य यांनी हायकमांडला केलं आहे.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत तीन अपक्ष आणि काँग्रेसच्या ६ आमदारांनी सरकारची साथ सोडली. क्रॉस वोटिंगमध्ये भाजपा उमेदवाराचा विजयी झाला. दरम्यान, काँग्रेस आमदार सुधीर शर्मा यांनी असा निर्णय का घ्यावा लागला हे सांगितलं आहे. सुक्खू यांच्या सरकारमध्ये नाराज असलेल्या सुधीर शर्मा यांनी म्हटलं की, राज्यापासून केंद्रीय नेतृत्वापर्यंत म्हणणं पोहोचवलं होतं. पण त्यात कुणीही ऐकलं नाही आणि कारवाई झाली नव्हती. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. आमदारांना मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्याकडून छळलं जात होतं. काँग्रेस आमदारांना त्यांच्याच मतदारसंघात काम करू दिलं जात नव्हतं. अनेकदा वरिष्ठांना सांगितलं पण त्यावर काहीच केलं जायचं नाही. आमदारांची घुसमट होत होती. काम होत नसल्याने लोक प्रश्न विचारायचे. आम्ही अनेक मुद्द्यांवर उघड नाराजी व्यक्त केली होती. पण ना मुख्यमंत्री ना वरिष्ठांनी ऐकून घेतलं. सरकारविरोधात भूमिका घेतलेले आमदार येत्या काही दिवसात निर्णय घेणार आहेत, असंही ते म्हणाले.
हे ही वाचा:
“ईडीकडून पाठविण्यात आलेल्या समन्सचा आदर करून त्याचे उत्तर द्यावे लागेल”
भाईंदरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांचा भाजपात प्रवेश!
कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी कारागृहातील बॅरेक वाढवणार
राज्यसभा मतदानावेळी झालेल्या क्रॉस व्होटिंगसाठी देखील मुख्यमंत्री जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. राजीनामा दिल्यानंतर आता विक्रमादित्य भाजपसोबत जाऊ शकतात अशीही चर्चा सुरु आहे.