23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारण"लाचारी पत्करण्यापेक्षा काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं" - विखे पाटील

“लाचारी पत्करण्यापेक्षा काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं” – विखे पाटील

Google News Follow

Related

“राज्यात काँग्रेसचं अस्तीत्वच राहीलं नाही. राज्यातील सत्तेतही त्यांचे अस्तीत्व नाही. काँग्रेसने आता इशारा देणं सोडून द्यावं. लाचारी पत्करून सत्तेत राहण्यापेक्षा काँग्रेसने सत्तेबाहेर पडावे” असा खोचक सल्ला भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला दिला. ते शिर्डीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला.

“ज्या ग्राहकांनी विजेचे बील भरलेले नाही, अशा ग्राहकांची वीजजोडणी तोडण्याचा निर्णय महावितरणने घेतलेला आहे. अनेक जिल्ह्यात वीजतोडणीचे कामसुद्धा सुरु झालेले आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारवर सर्व स्तरांतून टीका होत आहे.” यावर बोलताना विखे पाटील यांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढले. “हे सरकार विजतोडणीचे महान कार्य करत आहे. अगोदरच राज्यातील जनता आणि शेतकरी अडचणीत आहेत. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. राज्य सरकारने मोफत वीज देण्याची घोषणा केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी केली. आज धाकदडपशाहीने, दहशतीने नागरिकांकडून वीजबिलाची वसुली केली जात आहे. हे सरकार आपल्या घोषणा विसरलं आहे.” अशी टीका विखे पाटील यांनी केली.

हे ही वाचा:

वीजबिल वाढी विरोधात भाजपा करणार राज्यव्यापी आंदोलन

दरम्यान, पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री असलेले संजय राठोड यांचे नाव आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच सत्तेत राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती तडजोडी करणार आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याची लक्तरे वेशीला टांगली जात आहेत, अशी सणसणीत टीका विखे पाटील यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा