27 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारणविधानसभा निवडणूकही काँग्रेसने स्वबळावर लढवावी

विधानसभा निवडणूकही काँग्रेसने स्वबळावर लढवावी

Google News Follow

Related

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसह विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेचं काँग्रेसच्या नेत्यांनी समर्थन केलं आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनीही पटोलेंच्या सुरात सूर मिसळला आहे. खान यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थेसह विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची मागणी केली आहे.

मीडियाशी संवाद साधताना नसीम खान यांनी ही मागणी केली. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवल्या पाहिजेत ही प्रदेशाध्यक्ष पटोले यांची भूमिका रास्तच आहे. पटोले यांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असून आपले या भूमिकाला समर्थन असल्याचे खान म्हणाले.

काँग्रेस पक्ष सर्वात जुना पक्ष असून याआधी तो राज्यातही नंबर एकचा पक्ष राहिला आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षे काँग्रेसने एकहाती सत्ता आणलेली आहे. काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात आजही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार असून स्वबळावर निवडणुका लढल्यास पक्ष संघटनाही मजबूत होण्यास मदत होईल. राज्यातील पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावरच लढवाव्यात ही भूमिका रास्त आहे, असे खान म्हणाले.

काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवल्यास त्याचा पक्षाला फायदा होणार आहे. काँग्रेसला राज्यात गतवैभव प्राप्त करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घेतली भूमिका हीच पक्षाची भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट

भ्रष्टाचारांची मालिका हीच का ठाणे महापालिका? राहुल घुले प्रकरणावरून भाजपाचा सवाल

…तर पुन्हा निर्बंध लावले जातील; वडेट्टीवारांची पुन्हा घाई

शिवसेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध

तीन दिवसांपूर्वी पटोले अमरावतीत आले होते. यावेळी त्यांनी स्वबळावर लढण्याचा पुनरुच्चार केला होता. भाजप हा आमचा कायम विरोधी पक्ष आहे. शरद पवार भाजपविरोधात मोट बांधत असतील तर चांगली गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, असं पटोले यांनी पुन्हा एकदा जाहीर केलंय. त्याचबरोबर भाजपमध्ये गेलेली नेतेमंडळी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची आपल्याकडे मोठी यादी आहे, पण आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल, असंही पटोले यांनी म्हटलं होतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा