लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला जोरदार दणका बसला आहे. कॉंग्रेसला अनेक राज्यांमध्ये गळती लागलेली असताना गुजरात काँग्रेसचे नेते अर्जुन मोधवाडिया यांनीही राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे राजीनामा दिला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने राम लल्लांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाकारल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.
गुजरात काँग्रेस नेते अर्जुन मोधवाडिया यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “प्रभू राम हे केवळ हिंदूंचे पूजनीय नाहीत, तर ते भारताचे आस्था आहेत. प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे साक्षीदार होण्याचे निमंत्रण नाकारल्याने भारतातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. काँग्रेस लोकांच्या भावनांचे आकलन करण्यात एक पक्ष अयशस्वी ठरला आहे. या पवित्र प्रसंगाला आणखी विचलित करण्यासाठी आणि अपमानित करण्यासाठी, राहुल गांधींनी आसाममध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि भारतातील नागरिक आणखी संतप्त झाले आहेत.”
हे ही वाचा:
जगन्नाथपुरी मंदिरात घुसखोरी करणाऱ्या नऊ गैर-हिंदू बांगलादेशींना घेतलं ताब्यात
विभागीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत आलोक, दुर्वाला सुवर्ण
भाजपाने चंदीगड उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली
बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोटाचा तपास एनआयएकडे!
यापूर्वीही त्यांनी काँग्रेसच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. “भगवान श्री राम हे आराध्य देव आहेत. हा देशवासीयांच्या श्रद्धेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. काँग्रेस असे राजकीय निर्णय घेण्यापासून दूर राहायला हवे होते,” असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. राम मंदिराकडून काँग्रेस पक्षाला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते मात्र त्यांनी न स्वीकारता या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावर अनेक काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले होते.