नॅशनल हेराल्ड प्रकरणी काॅंग्रेस अध्यक्ष साेनिया गांधी यांची गेल्या काही दिवसांपासून ईडी चाैकशी सुरू असल्यामुळे काॅंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी झालेल्या चाैकशीनंतर साेनिया गांधी यांची बुधवारी देखील पुन्हा चाैकशी हाेणार आहे. याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेसने सकाळी मुंबईतील बाेरिवली स्थानकात साैराष्ट्र एक्सप्रेस राेखून जाेारदार आंदाेलन केले. रुळांमध्ये उतरून आंदाेलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना नंतर पाेलिसांकडून हटवण्यात आले.
हे ही वाचा:
वर्षभरात राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली आणणार
सिव्हील इंजिनिअर डिप्लोमा केलेल्यांना कंत्राटदार नोंदणीसाठी हिरवा कंदील
मध्य प्रदेशातही ‘सर तन से जुदा’चा प्रकार?
‘खोबरे गेले करवंटी हातात राहिली आतातरी शहाणे व्हा’
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची याआधी मागील आठवड्यात गुरुवारी चौकशी करण्यात आली होती. जवळपास साडे तीन तासांच्या चौकशीनंतर सोनिया गांधी यांना घरी जाण्यास ईडीने परवानगी दिली. त्यानंतर मंगळवारी २६ जुलै राेजी पुन्हा ६ तास चाैकशी करण्यात आली. त्या आधी राहुल गांधी यांची ईडी ५० तास चाैकशी केली हाेती. याच दरम्यान साेनिया गांधी यांचीही चाैकशी करण्यात येणार हाेती. परंतु काेराेनाची लागण झाल्यानंतर ही चाैकशी पुढे ढकलण्याची विनंती साेनिया गांधी यंनी ईडी अधिकाऱ्यांना केली हाेती.
ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, दोन दिवसांच्या चौकशीत सोनिया गांधींना ७५ प्रश्न विचारण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी सुमारे २५ प्रश्न विचारण्यात आले हाेते.सोनियांच्या चौकशीवरून काँग्रेस आज पुन्हा देशभर सत्याग्रह करणार आहे.