26 C
Mumbai
Thursday, January 2, 2025
घरराजकारणकर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा, काँग्रेसला मळमळ

कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा, काँग्रेसला मळमळ

काँग्रेसने केला निषेध तर भाजपाने दिले चोख प्रत्युत्तर

Google News Follow

Related

कर्नाटक विधानसभेत सोमवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तैलचित्राचे अनावरण झाले पण विरोधी पक्ष काँग्रेसने याविरोधात आंदोलन केले. कर्नाटकमधील विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी विधानसभेच्या बाहेर या विरोधात आवाज उठविला. बेळगावी येथील विधिमंडळाच्या सभागृहात अधिवेशनाला प्रारंभ झाला.

पहिल्या दिवशी आंदोलन करून काँग्रेसने आपला निषेध नोंदविला. कर्नाटकमधील भाजपा सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा लावली. त्यावरून मग काँग्रेसने विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. सिद्धरामय्या यांनी विधानसभा अध्यक्षांना यासंदर्भात पत्र लिहिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, वाल्मिकी, बसवण्णा, कनक दास, डॉ. आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमा तिथे असल्या पाहिजेत.

कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख आमदार डी. के. शिवकुमार यांनी म्हटले की, अशी पावले उचलून सरकार विधिमंडळातील कामकाजात अडचणी वाढवत आहे. विधानसभेचे कामकाज चालू नये असे सरकारचे प्रयत्न आहेत. सरकारविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे सरकारने सावरकरांची प्रतिमा बसविण्याचा घाट घातला आहे, असे आरोप काँग्रेस करत आहे. त्यावर भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे.

वैचारिक मतभिन्नता असली तरी स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यसेनानी होते. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीत यासंदर्भात सवाल उपस्थित केला की, मग कुणाचा फोटो लावावा? दाऊद इब्राहिमचा का?

हे ही वाचा:

आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु

मेस्सीचे वर्ल्डकपमध्ये अनेक विक्रम; एकाच स्पर्धेत सर्व फेऱ्यांत गोल नोंदविणारा एकमेव खेळाडू

हळद हसली, उत्पादन वाढले

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मविआचे आंदोलन

१० दिवसांच्या विधिमंडळ अधिवेशनात महाराष्ट्र कर्नाटक मुद्दाही उपस्थित होणार आहे. महाराष्ट्रातही आता अधिवेशन सुरू झाले असून त्यातही महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर चर्चा होणार आहे. शिवाय, छत्रपती शिवरायांच्या कथित अपमानाबाबतही या अधिवेशनात आवाज उठविला जाण्याची शक्यता आहे त्यावर जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सज्ज आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा